२४ नोव्हेंबर २०१९

पहिल्या ‘AIBA क्रिडापटू आयोग’वर एल. सरिता देवी ह्यांची सदस्य म्हणून निवड झाली

🔰आशियाई विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघाने (AIBA) प्रथमच क्रिडापटू आयोगावर पाच खंडांमधून सहा लोकांची निवड केली आहे.

🔰त्यात, भारतीय महिला मुष्टियोद्धा एल. सरिता देवी ह्यांची ‘AIBA क्रिडापटू आयोग’ (AIBA अॅथलीट्स कमिशन) याचा सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

🔰AIBA क्रिडापटू आयोगामध्ये आशिया, ओशिनिया, युरोप, अमेरिका आणि आफ्रिका या पाच खंडांमधून प्रत्येकी एक पुरुष आणि एक महिला अश्या दोघांचा समावेश केला जात आहे.

🔰2020 ऑलम्पिक स्पर्धेत मुष्टियुद्ध खेळाच्या आर्थिक आणि प्रशासकीय गैरव्यवस्थेसंबंधी त्रुटींना टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने (IOC) हे आयोग तयार करण्याची शिफारस केली होती. निवड झालेले सदस्य क्रिडा संघ आणि खेळाडूंच्या दरम्यान एक दुवा म्हणून कार्य करणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...