Wednesday 27 November 2019

‘नोमुरा खाद्य असुरक्षितता निर्देशांक’मध्ये भारत 44 व्या क्रमांकावर

नोमुरा ग्लोबल मार्केट रिसर्च या संस्थेनी ‘नोमुरा खाद्य असुरक्षितता निर्देशांक’ (NFVI) प्रसिद्ध केला आहे. खाद्यपदार्थाच्या किंमतींमध्ये होणार्‍या मोठ्या प्रमाणातल्या बदलांच्या आधारावर हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे. शीर्ष स्थान म्हणजे सुपरिस्थिती तर तळाशी म्हणजे वाईट परिस्थिती आहे.

दरडोई देशाची GDP; कुटुंबाच्या वापरामध्ये अन्नाचा वाटा; आणि खाद्याची निव्वळ आयात या तीन घटकांवर हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे.

दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) कमी असेल, वापरामध्ये अन्नाचा वाटा अधिक असेल आणि खाद्यपदार्थांची निव्वळ आयात सर्वोच्च असल्यास देशातल्या खाद्यपदार्थाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता असते.

🌼👌ठळक बाबी👇👇

🔸110 देशांमध्ये भारत 44 व्या स्थानी आहे.

🔸येत्या काही महिन्यांमध्ये जगातल्या 50 देशांमध्ये खाद्यपदार्थाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे, बहुधा उदयोन्मुख देशांमध्ये ही परिस्थिती येऊ शकते. या 50 देशांची एकत्रित लोकसंख्या जगातली जवळजवळ 60 टक्के आहे.

🔸खाद्यपदार्थाच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे ऑक्टोबर 2019 मध्ये भारताची किरकोळ महागाई 16 महिन्यांच्या उच्चांकावर गेली, जी 4.6 टक्के होती. खाद्यपदार्थाच्या महागाईचा दर सुमारे 8 टक्क्यांनी वाढला आहे, जो सरसरीच्या दुप्पट आहे. डाळी (महागाई दर 12%) आणि भाज्या (महागाई दर 26%) आणि मासे व मांस (महागाई दर 10%) अश्या आवश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या.

🔸हवामानाचे आघात (कमी पुरवठा), कच्च्या तेलाचे वाढलेले दर (वाहतुकीचे खर्च वाढला) आणि अमेरिकन डॉलरच्या मुल्यामधली घसरण (कमी आयात) हे असुरक्षिततेमागील तीन संभाव्य कारक दिसून आली आहेत.

No comments:

Post a Comment