Thursday, 7 November 2019

वर्षभरात कॅन्सरच्या रुग्णात 300 टक्क्यांनी वाढ

जगभरात कॅन्सरच्या रुग्णांत वेगाने वाढ होत आहे. दरवर्षी जवळपास 2 कोटी लोकांना कॅन्सरची लागण होत असल्याची माहिती समोर आली आहे.

वर्ष 2017 ते 2018 या एका वर्षात कॅन्सरचे रुग्ण 300 टक्क्यांनी वाढले आहेत. सर्वसामान्य कॅन्सरसह तोंडाचा कॅन्सर, सर्वाइकल कॅन्सर, छातीचा कॅन्सर या कॅन्सरचा यात समावेश आहे.

भारतात कॅन्सरच्या रुग्णात वेगाने वाढ होत आहे. यासंबंधीची आकडेवारी राष्ट्रीय आरोग्य प्रोफाईल 2019 च्या अहवालावरून समोर आली आहे.

*🤔 कॅन्सरची कारणे :*

बदलती जीवन शैली, यात तणाव, खाण्या पिण्यासंबंधीच्या सवयी, तंबाखू आणि दारू यांचे सेवन करणे हे प्रमुख कारण होय

*🌎 या राज्यांमध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या जास्त:-*

1. गुजरात
2.कर्नाटक
3.महाराष्ट्र
4.तेलंगणा
5. पश्चिम बंगाल

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...