डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. आपल्या संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे. आज संविधान दिनानिमित्त जाणून घेऊ आपल्या राज्यघटनेविषयी…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन (1947) झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारला गेला. यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस “भारतीय संविधान दिन” म्हणून साजरा केला जातो.
⭐️ भारतीय संविधान आणि वैशिष्ट्ये :
● भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
● भारताची राज्यघटना उद्देशिका, मुख्य भाग व 12 पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे.
● मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरूवातीच्या 395 कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.
● सध्या राज्यघटनेत 448 कलमे (39A, 51A यांसारखे कलमे घटना दुरुस्तीद्वारा) असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.
● भारतीय संविधान मुख्यत्वे 1935च्या भारत सरकार कायद्यावर आधारित आहे.
● भारताने अमेरिकेप्रमाणे अध्यक्षीय शासनपद्धती न स्वीकारता ब्रिटनप्रमाणे संसदीय शासनपद्धती स्वीकारली आहे.
● घटनेने लोकसभा व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणूकांसाठी सार्वत्रिक प्राैढ मतदानाची तरतूद केलेली आहे. 18 वर्षे पूर्ण असणारा प्रत्येक नागरिक या निवडणूकांमध्ये मतदान करू शकतो.
● भारत हे संघराज्य असूनही भारतीय राज्यघटनेने एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे.
● भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकार केला आहे. संपूर्ण देशासाठी केंद्र सरकार असून प्रत्येक घटक राज्यांसाठी स्वतंत्र सरकार आहे.
भारतीय संविधान तयार करताना विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास करण्यात आला आहे. इतर देशांच्या संविधानातील चांगल्या तरतूदी भारतीय संविधानात समाविष्ठ करण्यात आल्या. त्यातील गोष्टी खालीलप्रमाणे :
1) संसदीय शासन पद्धती : इंग्लंड
2) मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड
3) मूलभूत हक्क : अमेरिका
4) न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका
5) न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिकाय
6) कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड
7) सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड
8) कायदा निर्मिती : इंग्लंड
9) लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड
10) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
11) संघराज्य पद्धत : कॅनडा
12) शेष अधिकार : कॅनडा
No comments:
Post a Comment