१) कोणत्या समित्यांमध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले ?
अ) मूलभूत अधिकार समिती
ब) अल्पसंख्यांक उपसमिती
क) सल्लागार समिती
ड) राज्ये समिती
1) फक्त अ, ब, क
2) फक्त ब, क, ड
3) फक्त अ, ब, ड
4) फक्त अ, क, ड
उत्तर :- 1
२) भारतीय संघराज्य व्यवस्थेला ‘वाटाघाटीचे संघराज्य’ असे कोणी संबोधले आहे ?
1) के. सी. व्हिअर
2) आयव्हर जेनिंग्ज
3) ग्रॅनव्हिल ऑस्टिन
4) मॉरिस जोन्स
उत्तर :- 4
३) ‘भारत हे संघराज्य आहे’ यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ?
1) एक राज्यघटना
2) व्दिगृही कायदेमंडळ
3) राज्यघटनेची सर्वोच्चता
4) न्यायालयीन पुनर्विलोकन
उत्तर :- 1
४) भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?
1) स्वातंत्र्य
2) समता
3) न्याय
4) बंधुभाव
उत्तर :- 3
५) भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रीकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश 1976 च्या ............. घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला.
1) 44 वी 2) 41 वी
3) 42 वी 4) 46 वी
उत्तर :- 3
६) गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट – 1935 मधील खालील तरतूदी विचारात घ्या :
अ) या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो-इंडियन यांच्यासाठीही स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले.
ब) शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे सोपविले होते.
क) या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणती मंत्री परिषद नियुक्त केली गेली.
1) विधाने अ, ब बरोबर आहेत
2) विधाने ब, क बरोबर आहेत
3) विधाने अ, क बरोबर आहेत
4) विधाने अ, ब, क बरोबर
उत्तर :- 3
७) 1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
1) सभा पूर्णत: सार्वभौम संस्था बनली.
2) सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली.
3) सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली.
4) मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली.
उत्तर :- 3
८) संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते.
1) डॉ. बी. आर. आंबेडकर
2) जे. बी. कृपलानी
3) सरदार वल्लभभाई पटेल
4) जवाहरलाल नेहरू
उत्तर :- 3
९) .घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली.
1) आयर्लंड
2) यु. के.
3) यु. एस्. ए.
4) ऑस्ट्रेलिया
उत्तर :- 3
१०) 42 व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे :
1) सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य
2) सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य
3) सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य
4) प्रजासत्ताक गणराज्य
उत्तर :- 2
११) कोणत्या राजकीय पक्षाचे सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?
अ) कृषक प्रजा पक्ष
ब) शेडयूलड् कास्टस् फेडरेशन
क) कम्युनिस्ट पक्ष
ड) अपक्ष
1) फक्त अ, क, ड
2) फक्त ब, क, ड
3) फक्त अ, ब, ड
4) फक्त अ, ब, क
उत्तर :- 4
१२) खालील विधाने विचारात घ्या :
अ) भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली.
ब) सरदार हुकूम सिंग, के.टी. शाह, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.
क) संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लीम लीगचे सर्व सदस्य हजर होते.
वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?
1) अ आणि ब
2) ब आणि क
3) अ आणि क
4) अ, ब आणि क
उत्तर :- 1
१३) सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्टयांना संविधानाची पायाभूत वैशिष्टये म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्टयांचा त्यात समावेश होतो ते सांगा ?
अ) समतेचे तत्व
ब) न्यायालयीन पुनर्विलोकन
क) संघराज्य
ड) सार्वभौमत्व
1) अ, ब, क, ड
2) ब, क, ड
3) अ, ब, क
4) अ, ड, क
उत्तर :- 1
१४). भारताच्या संघराज्यात्मक पध्दतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
1) राज्यघटनेत ‘संघराज्य’ हा शब्दप्रयोग कोठेही केलेला नाही.
2) संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही.
3) अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वाचा भंग करतात.
4) राज्यपालाच्या नेमणूकीची पध्दत भारताने अमेरिकन पध्दती प्रमाणे स्वीकारली आहे.
उत्तर :- 4
१५) भारतात खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संघराज्य पध्दतीच्या विरोधी आहेत ?
अ) राज्ये अविनाशी नाहीत.
ब) आणीबाणी तरतूदी
क) अखिल भारतीय सेवा
ड) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व
इ) राष्ट्रपतीव्दारे राज्यांचा विधेयकावर नकाराधिकार
1) अ, ब, क, ड
2) ब, क, ड, इ
3) अ, ब, क, इ
4) ब, क, इ
उत्तर :- 3
No comments:
Post a Comment