Thursday 21 November 2019

प्रश्नसंच 22/11/2019

१) .  खालीलपैकी कोणती सरकारी लेखापरीक्षणाची उद्दिष्टये आहेत ?

   अ) तज्ञ अधिका-याने खर्चासाठी निधीची तरतूद केली आहे ते पाहणे.

   ब) खर्च हा मंजूर केला आहे ते पाहणे.

   क) खर्चाचे देय योग्य व्यक्तीला केले आहे हे पाहणे.

   ड) खर्चाचे वर्गीकरण केले आहे का ते पाहणे.

   1) अ व ब 
    2) ब व क   
    3) अ, ब व क
    4) वरील सर्व

    उत्तर :- 4
२) .  सार्वजनिक उपक्रमांच्या अंकेक्षणाचा खालीलपैकी कोणता एक प्रकार नाही ?

   1) सरकारी विभागाचे अंकेक्षण

   2) सरकारी वैधानिक महामंडळाचे अंकेक्षण

   3) सहकारी संस्थांचे अंकेक्षण

   4) सरकारी प्रमंडळाचे अंकेक्षण

    उत्तर :- 3

३) . 1991 नंतर पुढीलपैकी कोणत्या वर्षी परकीय चलन साठयात घट झाली ?

    1) 1993 – 94
    2) 2000 – 01
    3) 2007 – 08
    4) 2008 – 09

     उत्तर :- 4

४) .  अ) जुलै 1991 मध्ये भारतीय रूपयाचे 18 टक्के अवमूल्यन करण्यात आले.

    ब) अवमूल्यनामुळे व्यापारतूट भरून काढण्यास मदत होते.

   1) फक्त अ बरोबर आहे. 

    2) फक्त ब बरोबर आहे.

   3) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत.

   4) अ आणि ब दोन्हीही चूक आहेत.

    उत्तर :- 3

५) .  2012-2013 मध्ये रोखतेची स्थिती सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँकेने

   अ) सी.आर.आर. व एस्.एल्.आर. कमी केले.

   ब) सी.आर.आर. कमी केला पण एस्.एल्.आर. बदलला नाही.

   क) एस्.एल्.आर. कमी केला पण सी.आर.आर. बदलला नाही.

   1) अ फक्त बरोबर आहे. 
   2) अ आणि ब बरोबर आहे.
   3) अ आणि क बरोबर आहे.
   4) वरीलपैकी एकही नाही.

   उत्तर :- 1

६) .  2011-12 मध्ये भारताच्या रूपया प्रमाणे खालीलपैकी कोणत्या ‍विकसनशील अर्थव्यवस्थांच्या चलनाचे अवमूल्यनाचे झाले ?

   1) ब्राझील, मेक्सिको, रशिया

   2) मेक्सिको, साऊथ कोरिया, जर्मनी

   3) रशिया, साऊथ आफ्रिका, हाँगकाँग

  4) साऊथ कोरिया, जपान, चीन

  उत्तर :- 1

७) . भारतातील पैसा पुरवठयाचे M1 व M2 हे प्रकार खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जातात ?

   1) सार्वजनिक व खासगी पैसा

   2) अंतर्गत व बाह्य पैसा

   3) संकुचित व विस्तारित पैसा 

  4) स्थिर व बदलता पैसा (गतिमान)

   उत्तर :- 3

८) . भारतीय रिझर्व्ह बँकेव्दारा मुद्रापुरवठा मापनाच्या प्रचलांची नव्याने व्याख्या करण्यासाठी अलिकडच्या काळात नियुक्त केलेल्या
     कार्य गटाने भारतातील मुद्रापुरवठयाच्या संकल्पनेतून खालील घटक रद्द केला आहे.

    1) M1 
   2) M2     
   3) M3     
   4) M4

   उत्तर :- 4

९) . पुढील दोन पैकी कोणते विधान योग्य आहे ?

   अ) भारतीय रूपयाचे अवमूल्यन, पूर्ण परिवर्तनियतेकडे प्रथम पाऊल होते.

   ब) भारताने चालू खात्यावरील पूर्ण परिवर्तनियता 19 ऑगस्ट, 1995 रोजी स्वीकारली.

   1) केवळ अ
   2) केवळ ब  
   3) दोन्हीही  
   4) एकही नाही

    उत्तर :- 1

१०).  मध्यवर्ती बँकेच्या मौद्रिक व पतविषयक धोरणातील खालीलपैकी कोणत्या मौद्रिक साधनांचा पैशाच्या विस्तारावर सारखाच
     परिणाम होतो.

   1) रोख राखीव गुणोत्तर 
   2) वैधानिक रोखता गुणोत्तर
   3) वरील दोन्ही  
   4) वरील एकही नाही

    उत्तर :- 3

११) .  योग्य क्रम लावा. (मुलभूत कर्तव्य)

   अ) राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान   करणे 
 
ब) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे

   क) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे

   ड) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे

    1) अ, ब, क, ड
    2) अ, ड, क, ब  
    3) अ, ब,  ड, क
    4) अ, ड, ब, क

उत्तर :- 2

१२) . ‘मुलभूत कर्तव्या’ बाबतच्या खालील विधानांचा विचार करा.

   अ) म्हटले तर त्यांना काही महत्त्व नसते.

   ब) ती 42 व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.

   क) ही कर्तव्ये राज्यघटनेच्या विभाग IV अ मध्ये व कलम 51 अ मध्ये दिली आहेत.

   ड) अशीच कर्तव्ये अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये आहे.

          वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

    1) अ, ब
    2) ब, क 
    3) क, ड  
    4) अ, ब, क

     उत्तर :- 4

१३).  खालीलपैकी कशाचा मुलभूत कर्तव्यांशी संबंध नाही ?

   अ) ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुकरण करणे.

   ब) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे.

   क) कमकुवत घटकांच्या विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधात वृद्धी करणे.

   ड) ऐतिहासिक हितसंबंधाच्या आणि राष्ट्रीय दृष्टया महत्त्वाच्या स्मारकांचे रक्षण करणे.

   1) अ, ब 
   2) ब, क   
   3) क, ड  
   4) फक्त ड

    उत्तर :- ३

१४).  भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे ?

   1) डॉ. राजेंद्र प्रसाद 
   2) डॉ. झाकीर हुसेन
   3) आर. व्यंकटरमण्‍  
   4) के. आर. नारयणन्

    उत्तर :- 1

१५).  भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात ?

   1) लोकसभेचे निर्वाचित सदस्य
   2) राज्यसभेचे निर्वाचित सदस्य
   3) विधानसभेचे निर्वाचित सदस्य
   4) वरील सर्वच

    उत्तर :- 4

१६) .  खालील विधाने विचारात घ्या.

   अ) 1976 च्या 42 व्या घटनादुरुस्तीने नागरिकांची मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.

   ब) 2002 मध्ये 86 व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांची संख्या वाढून अकरा झाली आहे.

   क) मूलभूत कर्तव्यांची शिफारस संथन्म समितीने केली होती.

         वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) अ, ब  
   2) ब, क     
   3) अ, क    
   4) अ, ब, क

उत्तर :- 1

२४७).  भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली ?

   1) एम. सी. छागला
   2) एम. हिदायतुल्ला 
   3) वाय. चंद्रचूड   
   4) वरीलपैकी नाही

    उत्तर :- 2

२४८).  भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ?

   1) पंतप्रधान   
   2) राज्यपाल 
   3) राष्ट्रपती   
   4) मुख्य न्यायाधीश

    उत्तर :- 3

३४९) .  राष्ट्रपतींच्या निवडणूकीत मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री अपात्र ठरतो ....................

      अ) जर तो स्वत: उमेदवार असेल.  

       ब) जर त्याने बहुमत सिद्ध केले नसेल.

      क) जर तो राज्यविधिमंडळाच्या वरिष्ठ गृहाचा सदस्य असेल. 

  ड) जर तो काळजीवाहू मुख्यमंत्री असेल.

   1) अ      2) ब      3) क      4) ड

    उत्तर :- 3

२५०).  खालीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे ?

   अ) जर राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला, तर लोकसभेचे सभापती नवीन राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळतात.

   ब) राष्ट्रपतींच्या निवडणूकीच्या संदर्भात किमान आणि कमाल वयोमर्यादा भारतीय संविधानात नमूद आहे.

   क) भारतात राष्ट्रपती संसदेचा भाग आहेत.

     1) अ, ब  
     2) ब, क    
     3) अ, क
     4) फक्त क

     उत्तर :- 4

No comments:

Post a Comment