Thursday, 21 November 2019

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच 22/11/2019

१)  भारतीय राज्यघटनेत नमुद मुलभूत कर्तव्यामध्ये नमुद आशय अंतर्भूत असला तरी खालील विधानांमधील काही शब्द
     विशेषत्वाने नमुद नाहीत ते जादाचे नमुद केले आहेत अशी खालीलपैकी कोणती विधाने आहेत ?

   अ) राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व  देशातील कायद्याचा आदर करणे.
   ब) स्त्रियांच्या व बालकांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणा-या प्रथांचा त्याग करणे.
   क) सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे रक्षण करणे.
   ड) आठव्या वर्गापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करणे.
   1) अ, क    2) ब      3) ड      4) सर्व

उत्तर :- 4
२)  मार्गदर्शक तत्त्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत. तर मुलभूत कर्तव्ये .................... च्या अपेक्षा आहेत.

   1) मंत्रीमंडळ    2) जनता      3) प्रतिनिधी    4) सर्वोच्च न्यायालय

उत्तर :- 2

३)   योग्य क्रम निवडा.
   अ) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे    ब) सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे
   क) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे    ड) संविधानाचा सन्मान करणे

   1) अ, ड, क, ब    2) ड, अ, क, ब    3) ड, ब, अ, क    4) ड, अ, ब, क

उत्तर :- 2

४)  खालीलपैकी भारतीय नागरिकाचे कोणते मुलभूत कर्तव्य नाही  ?
   1) देशाचे संरक्षण करणे            
   2) नियमित कर भरणे
   3) सहा ते 14 वर्षा दरम्यानचे अपत्य किंवा पाल्य यास शिक्षणाच्या संधी देणे    4) एकही नाही

उत्तर :- 2

५)  राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा केलेला समावेश लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे ?
   अ) जेव्हा राज्यघटना सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे.
   ब) राज्याच्या आणि व्यक्तींच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्ये मान्य केली पाहिजेत.
   क) ही कर्तव्ये मुलभूत हक्कांना पूरक आहेत.
   ड) समावेशनामुळे सुसंस्कृत समाजातील नागरिकामध्ये नागरी जाणीव विकसित होईल.
        वरील विधानांपैकी कोणते बरोबर आहे / आहेत ?
   1) अ   
    2) ब, क 
    3) अ, ब, क
    4) सर्व

उत्तर :- 4

६)  मुलभूत कर्तव्यांबाबत योग्य क्रम लावा.

अ) सार्वभौमत्वाचे रक्षण 

ब) राष्ट्रगीताचा सन्मान

क) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण

ड) वैज्ञानिक दृष्टिकोन

    1) अ, ब, क, ड
    2) ब, अ, क, ड  
    3) ब, अ, ड, क  
    4) ड, क, ब, अ

उत्तर :- 3

७)  एका विशिष्ट मुलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी पूरक अशा सर्वोच्च न्यायालयापुढील 138 निवडयांचा उल्लेख मुलभूत कर्तव्यांविषयीच्या वर्मा आयोगाने केला आहे. खाली नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यांपैकी कोणत्या मुलभूत कर्तव्याचा उल्लेख यासंदर्भात समितीने केला आहे ?

   1) संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रधज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.

   2) भारतातील जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे.

   3) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करून त्यात सुधारणा करणे.

   4) 6 ते 14 वयोगटातील बालकास शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

उत्तर :- 3

८)  खालीलपैकी कोणते मुलभूत कर्तव्य नाही ?

   1) संविधानाचे पालन करणे, संविधानातील आदर्श, संस्था व राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.

   2) देशाचे संरक्षण व देशसेवा करण्यास तयार राहणे.

   3) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून जतन करणे.

   4) पंचायत राजची निर्मिती करणे.

उत्तर :- 4

९)  खालील विधाने लक्ष्यात घ्या :

   अ) स्वर्ण सिंह समितीच्या
मुलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात करण्यात आला.

   ब) मुलभूत कर्तव्ये फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत.

   क) केशवानंद भारती केस मुलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे.

        वरीलपैकी कोणते / ती विधान/ ने बरोबर आहे / त ?

   1) अ, ब
   2) ब, क   
   3) अ, क  
   4) क

उत्तर :- 1

१०) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) सरदार स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीवरून 42 व्या घटनादुरुस्तीने मुलभूत कर्तव्यांची यादी भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केली गेली.

   ब) 2006 मध्ये 86 व्या घटनादुरुस्तीव्दारे सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मुक्त व अनिवार्य प्राथमिक शिक्षण देणे शासनासबंधनकारक केले गेले.

        वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

   1) अ 
    2) ब  
   3) अ, ब  
   4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 1

११) .  योग्य क्रम लावा. (मुलभूत कर्तव्य)

   अ) राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान   करणे 
 
ब) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे

   क) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे

   ड) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे

    1) अ, ब, क, ड
    2) अ, ड, क, ब  
    3) अ, ब,  ड, क
    4) अ, ड, ब, क

उत्तर :- 2

१२) . ‘मुलभूत कर्तव्या’ बाबतच्या खालील विधानांचा विचार करा.

   अ) म्हटले तर त्यांना काही महत्त्व नसते.

   ब) ती 42 व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.

   क) ही कर्तव्ये राज्यघटनेच्या विभाग IV अ मध्ये व कलम 51 अ मध्ये दिली आहेत.

   ड) अशीच कर्तव्ये अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये आहे.

          वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

    1) अ, ब
    2) ब, क 
    3) क, ड  
    4) अ, ब, क

     उत्तर :- 4

१३).  खालीलपैकी कशाचा मुलभूत कर्तव्यांशी संबंध नाही ?

   अ) ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुकरण करणे.

   ब) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे.

   क) कमकुवत घटकांच्या विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधात वृद्धी करणे.

   ड) ऐतिहासिक हितसंबंधाच्या आणि राष्ट्रीय दृष्टया महत्त्वाच्या स्मारकांचे रक्षण करणे.

   1) अ, ब 
   2) ब, क   
   3) क, ड  
   4) फक्त ड

    उत्तर :- ३

१४).  भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे ?

   1) डॉ. राजेंद्र प्रसाद 
   2) डॉ. झाकीर हुसेन
   3) आर. व्यंकटरमण्‍  
   4) के. आर. नारयणन्

    उत्तर :- 1

१५).  भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात ?

   1) लोकसभेचे निर्वाचित सदस्य
   2) राज्यसभेचे निर्वाचित सदस्य
   3) विधानसभेचे निर्वाचित सदस्य
   4) वरील सर्वच

    उत्तर :- 4

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...