Monday 18 November 2019

भारतात विश्व कबड्डी चषक 2019 खेळवली जाणार

🔰दिनांक 1 डिसेंबर ते 9 डिसेंबर या काळावधीत होणार्‍या ‘विश्व कबड्डी चषक 2019’ या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आले आहे. ही स्पर्धा पंजाब राज्यात खेळवली जाणार आहे.

🔰यावर्षी भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, केनिया, न्यूझीलँड, पाकिस्तान आणि कॅनडा अश्या नऊ संघांचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे.

🔰या स्पर्धेचे उद्घाटन 1 डिसेंबर रोजी गुरु नानक क्रिडामैदान, सुलतानपूर लोधी येथे होणार असून त्या दिवशी चार सामने खेळवले जाणार आहेत. तर डेरा बाबा नानक येथील शहीद भगतसिंग क्रिडामैदानावर या स्पर्धेचा समारोप होणार आहे. स्पर्धेचे इतर सामने अमृतसर, फिरोजपूर, भटिंडा, श्री आनंदपूर साहिब येथे होणार आहेत.

✅जागतिक कबड्डी महासंघाविषयी

🔰दिनांक 1 ऑक्टोबर 2004 रोजी जागतिक कबड्डी महासंघाची स्थापना झाली.

🔰आंतरराष्ट्रीय पातळीवर कबड्डी या खेळाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ही संघटना तयार करण्यात आली.

🔰 ह्यामध्ये 31 राष्ट्रीय संघांचा समावेश आहे. संघटनेचे मुख्यालय नवी दिल्ली, भारत येथे आहे.

🔰जनार्दन सिंग गेहलोत हे संघटनेचे संस्थापक आणि विद्यमान अध्यक्ष आहेत.

No comments:

Post a Comment