Monday, 11 November 2019

‘टायगर ट्रायम्फ 2019’: भारत आणि अमेरिका यांच्यातला त्रि-दलीय लष्करी सराव

● 13 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत आंध्रप्रदेशाच्या विशाखापट्टणम आणि काकीनाडा या शहरांच्या जवळ भारत आणि अमेरिका यांच्यातला पहिला त्रि-दलीय लष्करी सराव होणार आहे. 

● ‘टायगर ट्रायम्फ 2019’ हे या सरावाचे नाव आहे.

● या सरावात सुमारे 12 हजार भारतीय आणि 500 अमेरिकेचे भू-सैनिक, नौ-सैनिक आणि हवाई सैनिक भाग घेणार आहेत.

● या सरावात आपत्ती निवारण आणि मानवतावादी मदत या घटकांवर भर दिला जाणार आहे.

● शिवाय दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये सामंजस्य वाढविण्यावर भर दिला जाणार आहे आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्यात येणार आहे.

★∆★  संयुक्त राज्ये अमेरिका (USA)  ★∆★

▪️उत्तर अमेरिका खंडातला संयुक्त राज्ये अमेरिका (अमेरिकेची संयुक्त संस्थाने किंवा संयुक्त संस्थाने – USA/US) हा देश जगात सर्वत्र केवळ अमेरिका या नावाने ओळखला जातो.

▪️देशातली प्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. केंद्रीय स्तरावरचा राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुखपद भूषवतो. भौगोलिकदृष्ट्या कॅनडा, मेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत.

▪️ अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी.' येथे आहे आणि अमेरिकन डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.

▪️19 नोव्हेंबर 1493 रोजी ख्रिस्तोफर कोलंबस याला अमेरिकेचा शोध लागला.

▪️त्यानंतर ब्रिटिश आणि फ्रान्स राजवटींनी त्या प्रदेशात आपले वर्चस्व वाढवले. शेवटी 4 जुलै 1776 रोजी अमेरिकेला ब्रिटन पासून स्वातंत्र्य मिळाले.

No comments:

Post a Comment