देशातल्या पशू संख्येची आकडेवारी स्पष्ट करणारी 20वी ‘पशुधन गणना’ याचा अहवाल केंद्र सरकारने प्रसिद्ध केला आहे.
अहवालात असे दिसून आले आहे की, देशात दुभत्या जनावरांची संख्या वाढत असून देशी आणि क्रॉस-ब्रीड मादा गुराढोरांची संख्या वाढत आहे.
🏆 ताज्या आकडेवारीनुसार -
• सन 2019 मध्ये एकूणच पशुधनाची संख्या 535.78 दशलक्ष एवढी होती.
• मुख्यत: मेंढ्या व बकरींच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
• गेल्या वर्षांत घट झाल्यानंतर एकूण जनावरांची संख्या किरकोळ वाढलेली आहे.
• देशी जनावरांच्या संख्या सन 2012 पासून स्थिर आहे.
• सन 2019 मध्ये गुराढोरांची संख्या 192.49 दशलक्ष होती (2012च्या गणनेच्या तुलनेत 0.8 टक्क्यांची वाढ). ही वाढ मुख्यत: क्रॉस-ब्रीड गुरांच्या वाढीमुळे झाली आहे ज्यामुळे दुधाचे प्रमाण जास्त आहे.
• मादा क्रॉस-ब्रीड गुराढोरांची संख्या 46.95 दशलक्षांवर गेली. देशी मादा गुराढोरांची संख्या 98.17 दशलक्ष झाली आहे. म्हशींची संख्या 109.85 दशलक्ष एवढी झाली.
• दुभत्या जनावरांच्या संख्येत 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
• सन 2018-19 मध्ये भारतात एकूण 188 दशलक्ष टन दूध उत्पादन झाले. त्यात क्रॉस-ब्रीड प्राण्यांचे जवळपास 28 टक्के योगदान होते, असा अंदाज आहे.
• घरामागच्या अंगणात होणार्या कुक्कुटपालनात वाढ दिसून आली आहे. सन 2019 मध्ये कोंबड्यांची संख्या 851.18 दशलक्ष इतकी होती (2012च्या तुलनेत 17 टक्क्यांनी वाढ).
No comments:
Post a Comment