Friday 15 November 2019

ऑक्टोबर 2019 मध्ये भारताच्या विजेच्या मागणीत गेल्या 12 वर्षांमध्ये सर्वाधिक मासिक घट झाली: CEA

🔰केंद्रीय वीज प्राधिकरणाचे विजेची मागणी संदर्भातला मासिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबर 2019 या महिन्यात भारताच्या विजेची मागणीत 13.2 टक्क्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे, जी की गेल्या 12 वर्षांच्या तुलनेत आतापर्यंतची सर्वात वेगाने झालेली मासिक घट आहे.

🔰आशिया खंडातली तिसर्‍या क्रमांकाच्या अर्थव्यवस्था असलेल्या भारतातली वाढती मंदी ही आकडेवारी दर्शविते.

🔴आकडेवारीनुसार दिसून आलेल्या ठळक बाबी :-

🔰महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या मोठ्या औद्योगिक राज्यांमध्ये विजेच्या मागणीत घट झाली. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्रातली विजेची मागणी 22.4 टक्क्यांनी तर गुजरातमध्ये 18.8 टक्क्यांनी घटली.

🔰देशाच्या उत्तर आणि पूर्वेकडील चार छोट्या राज्यांना वगळता सर्व प्रदेशात विजेच्या मागणीत घट झाली आहे.

🔰सप्टेंबर 2019 मध्ये भारतामधल्या पायाभूत सुविधांचे उत्पन्न 5.2 टक्क्यांपर्यंत घसरले आहे, जे की गेल्या 14 वर्षातले सर्वाधिक कमी आहे.

🔰उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश यासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये वीज मागणी घटल्याचे दिसून आले आहे. मध्यप्रदेशामध्ये विजेची मागणी एक चतुर्थांशने तर उत्तरप्रदेशामध्ये 8.3 टक्क्यांनी कमी झाली.

🔰भारत सरकारचे केंद्रीय वीज प्राधिकरण (CEA) ही संस्था मूळत: 1948 सालाच्या कायद्याच्या अंतर्गत स्थापन केली गेलेली संस्था आहे, ज्याची 2003 साली पुनर्स्थापना केली गेली. सन 1951 मध्ये ते अर्धवेळ मंडळ म्हणून नेमण्यात आले आणि सन 1975 मध्ये ते पूर्णवेळ मंडळ म्हणून नेमण्यात आले.

No comments:

Post a Comment