✍गुरुनानकांच्या आयुष्यातल्या तीन महत्त्वाच्या टप्प्यांच्या दृष्टीने त्यांचं जन्मस्थान ननकानासाहिब (पाकिस्तान), सुलतानपूर लोधी (भारत) आणि कर्तारपूर या शहरांना विशेष महत्त्व आहे.
✍ननकाना साहिब
गुरुनानकांचं हे जन्मस्थळ आज पाकिस्तानात आहे.
✍सुलतानपूर लोधी
गुरुनानकांच्या आयुष्यातलं हे दुसरं महत्त्वाचं ठिकाण असं म्हणता येईल. भारतातल्या या जागी त्यांनी जवळपास 14-15 वर्षं घालवली. त्यांच्या वास्तव्याशी संबंध असलेल्या 5 महत्त्वाच्या जागा इथे आहेत.
✍बेबे नानकी यांचं घर
इथे गुरूनानक यांची बहीण आपले पती जय रामजी यांच्यासोबत राहत असे. इथली पाणपोई आजही सुरू आहे. घराच्या पहिल्या मजल्यावर गुरू ग्रंथ साहिब ठेवण्यात आलाय आणि तिथे एक संग्रहालयही आहे.
✍गुरुद्वारा हट साहिब
नानकी यांचे पती जय रामजी यांनी सुलतानपूर लोधीमधल्या एका गुरुद्वारामध्ये गुरुनानक देव यांची नियुक्ती केली होती. त्याच ठिकाणी आज हा गुरुद्वारा हट साहिब आहे.
✍गुरुद्वारा बेर साहिब
या ठिकाणी गुरुनानक ध्यानधारणा करायचे. इथे असलेलं एक बोराचं झाड गुरूनानक यांनी लावलं असल्याचं शीख समुदायाची धारणा आहे.
✍गुरुद्वारा संत घाट
ना हिंदू - ना मुस्लिम हा संदेश गुरुनानक यांनी इथेच दिला होता.
✍सुलतानपूर लोधी नावाची ही जागा भारतातल्या पंजाबमधील कपूरथलाजवळ आहे. इथल्या नवाब दौलत लोधी यांच्याकडे गुरूनानकांनी कामही केल्याचं मानलं जातं. त्यांच्या मुलांचा जन्मही इथेच झाला.
✍कर्तारपूर गुरुद्वारा
कर्तारपूर साहिब पाकिस्तानात असलं तरी ते भारतापासून फक्त साडेचार किलोमीटरवर आहे.
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक 1522मध्ये कर्तारपूरला आले होते, असं मानलं जातं. आपल्या आयुष्याची शेवटची 18 वर्षं त्यांनी इथेच घालवली.
✍प्रकाश पर्व म्हणजे काय आणि कसं साजरं केलं जातं?
गुरुनानक यांचा जन्मदिवस शीख समुदायात 'प्रकाश पर्व' म्हणून साजरा केला जातो.
No comments:
Post a Comment