Wednesday, 27 November 2019

13 सूक्ष्म उपग्रहांसहित भारताच्या ‘कार्टोसॅट-3’चे प्रक्षेपण यशस्वी

दिनांक 27 नोव्हेंबर 2019 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी 1625 किलो वजनाच्या ‘कार्टोसॅट-3’ उपग्रहाचे प्रक्षेपण करून इतिहास रचला आहे.

PSLV C-47 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे 102 वे उड्डाण आहे.

“कार्टोसॅट” ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) पृथ्वीच्या निरीक्षणासाठी बनविलेल्या उपग्रहांची मालिका आहे. ‘कार्टोसॅट-3’ हे कार्टोसॅट मालिकेतले सातवे उपग्रह आहे.

पृथ्वीची छायाचित्रे काढण्यासाठी, तसेच नकाशा निर्मितीसाठी ‘कार्टोसॅट-3’ उपग्रहाचा उपयोग होणार आहे.

उपग्रह अंतराळात पाच वर्षे कार्यरत राहणार आहे. उपग्रहामध्ये हाय-रिझोल्युशनची छायाचित्रे घेण्याची क्षमता आहे. याचा उपयोग नगर नियोजन, पायाभूत सुविधा विकास, किनारपट्टी विकासात होणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...