Saturday 9 November 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पुढे दिलेल्या शब्दांतील व्याकरणदृष्टया योग्य शब्द कोणता?

   1) जाहिरात    2) जाहीरात    3) ज्याईरात    4) जाहरात

उत्तर :- 1

2) मराठीच्या वर्णमालेतील ‘य’ आणि ‘व’ यांना म्हणतात.

   1) अर्धस्वर    2) स्वर      3) महाप्राण    4) व्यंजन

उत्तर :- 1

3) दिक् + पाल = दिक्पाल हा संधी प्रकार कोणता ?

   1) व्यंजन संधी    2) स्वरसंधी    3) अनुनासिक संधी  4) विसर्ग संधी

उत्तर :- 1

4) पदार्थवाचक नावे ओळखा.

   1) कलप, वर्ग, सैन्य, घड    2) स्वर्ग, देव, अप्सरा, नंदनवन
   3) दूध, साखर, कापड, सोने  4) पुस्तके, चेंडू, कागद, लेखणी

उत्तर :- 3

5) जोडया जुळवा.

   अ) दर्शकसर्वनामे    i) कोणत्याही नामाचा वा पदार्थाचा बोध होत नाही.
   ब) प्रश्नार्थक सर्वनामे    ii) जवळचा व लांबचा प्राणी वा पदार्थ दाखवतात.
   क) अनुसंबंधी सर्वनामे    iii) प्रश्न विचारण्याच्या कामी येतात. 
   ड) अनिश्चित सर्वनामे    iv) एकाच वाक्यात दोन नामांना जोडून येतात.

  अ  ब  क  ड

         1)  iv  iii  i  ii
         2)  ii  iv  iii  i
         3)  ii  iii  iv  i
         4)  i  iii  ii  iv

उत्तर :- 3

6) ‘वर पिता मुलाच्या लग्नात तो-यात वावरत असतो.’ अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा.

   1) नाम      2) सर्वनाम    3) विशेषण    4) क्रियापद

उत्तर :- 3

7) ‘तो गातो’ या वाक्यात ................. नाही.

   1) कर्म      2) कर्ता      3) क्रियापद    4) विशेषण

उत्तर :- 1

8)  i) पतंग झाडावर अडकला होता.
     ii) पतंग वर जात होता.

   a) विधान नं. (i) शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण आहे.
   b) विधान नं. (ii) क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण नाही.
   c) विधान नं. (ii) क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण आहे.
   d) विधान नं. (i) शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण नाही.
    1) फक्त (d) बरोबर    2) फक्त (b) बरोबर   
   3) फक्त (a) व (c) बरोबर    4) सर्व चूक

उत्तर :- 3

9) दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

    ‘जोगा’
   1) करणवाचक    2) योग्यतावाचक    3) संबंधवाचक    4) भागवाचक

उत्तर :- 2

10) विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. – या वाक्यात ‘आणि’ हे ............... आहे.

   1) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय    2) क्रियाविशेषण
   3) केवलप्रयोगी अव्यय        4) क्रियापद

उत्तर :- 1

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...