1) पुढील वाक्यातील उद्देश्य विस्तार कोणता?
‘बाभळीच्या काटेदार फांद्यांनी ती गाडी शिगोशिग भरली होती.’
1) ती गाडी 2) शिगोशिग 3) भरली होती 4) बाभळीच्या काटेदार फांद्यांनी
उत्तर :- 4
2) ‘आजी दृष्ट काढते’ वाक्यातील प्रयोग ओळखा.
1) कर्मणी प्रयोग 2) कर्तरी प्रयोग 3) भावे प्रयोग 4) शक्यकर्मणी प्रयोग
उत्तर :- 2
3) ‘चक्रपाणी’ या सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा.
1) मध्यमपद लोपी समास 2) समाहार व्दंव्द
3) इतरेतर व्दंव्द 4) कोणताही नाही
उत्तर :- 4
4) विरामचिन्हांचा वापर करताना ‘संयोगचिन्हाचा वापर करण्यात येतो.’
अ) दोन शब्द जोडताना ब) संबोधनाकरिता वापर केला जातो
क) दुस-याचे मत अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी ड) ओळीच्या शेवटी शब्द अपूरा राहिल्यास
1) ब बरोबर 2) ब, ड बरोबर 3) क 4) अ, ड बरोबर
उत्तर :- 4
5) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ! (अलंकार ओळखा.)
1) श्लेष अलंकार 2) यमक अलंकार 3) अतिशयोक्ती अलंकार 4) उपमा अलंकार
उत्तर :- 4
6) सिध्द शब्द ओळखा.
1) येऊन 2) ये 3) येवो 4) येणार
उत्तर :- 2
7) ‘चला पानावर बसा’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
1) व्यागार्थ 2) लक्षार्थ 3) वाच्यार्थ 4) संकेतार्थ
उत्तर :- 2
8) ‘पाणी’ या शब्दाच्या समानार्थी शब्द शोधा :
1) जल 2) जलद 3) ढग 4) क्षार
उत्तर :- 2
9) ‘अवरोहण’ या शब्दाला विरुध्दार्थी शब्द निवडा.
1) उन्नत 2) अवनत 3) आरोहण 4) प्रारंभ
उत्तर :- 3
10) ‘फायदा असेपर्यंत सारे गोळा होतात.’ – हा अर्थ स्पष्ट करणारी योग्य म्हण निवडा.
1) हात ओला तर मित्र भला 2) मूल होईना सवत साहीना
3) मनास मानेल तोच सौदा 4) फुले वेचली तेथे गोव-या वेचू नये
उत्तर :- 1
No comments:
Post a Comment