Wednesday, 6 November 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) “तुम्ही म्हणालात तर आम्हीदेखील नाटकाला येऊ.” – या वाक्यामध्ये कोणते अव्यय आले आहे  ?

   1) क्रियाविशेषण अव्यय    2) साधित शब्दयोगी अव्यय
   3) शुध्द शब्दयोगी अव्यय    4) केवलप्रयोगी अव्यय

उत्तर :- 3

2) ‘आम्ही हाच साबण वापरतो. कारण की तो स्वदेशी आहे.’ अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार सांगा.

   1) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय    2) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
   3) कारणदर्शक उभयान्वयी अव्यय      4) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 3

3) मी आपला गप्पच उभा होतो. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

   1) व्यर्थ उद्गारवाची    2) पादपुरणार्थ अव्यये    3) प्रशंसा दर्शक    4) तिरस्कार दर्शक

उत्तर :- 1

4) लाख्यात प्रत्ययावरून कोणता काळ सूचित होतो ?

   1) भूतकाळ      2) वर्तमानकाळ      3) भविष्यकाळ    4) सर्वकाळ

उत्तर :- 1

5) क्रियापदातील ई – आख्यात, ऊ – आख्यात आणि ई – लाख्यांत ह्यांचे मूळ संस्कृतांतील आख्यातप्रत्यांपासूनच आले असल्याने
    त्यांत ................ हा  गुणधर्म आढळतो.

   1) फक्त पुल्लिंगात बदल व इतर लिंगे समान      2) फक्त स्त्रीलिंगात बदल व इतर लिंगे समान
   3) तिन्ही लिंगी समान          4) तिन्ही लिंगात बदल संभवतो

उत्तर :- 3

6) अनेकवचनाच्या प्रकाराबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

   1) भाषा – भाषा    2) सभा – सभा    3) फोटो – फोटो    4) घोडा – घोडे

उत्तर :- 4

7) विभक्तीच्या अर्थाने शब्दयोगी अव्यये नामास लागतात व ती लागण्यापूर्वी त्यांचे बहुधा सामान्यरूप होते त्या रूपास काय
     म्हणतात ?

   1) अधिकरण    2) संप्रदान    3) करण      4) विभक्तीप्रतिरूपक अव्यये

उत्तर :- 4

8) ‘राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरविले, तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला’ – ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

   1) संयुक्त वाक्य    2) मिश्र वाक्य    3) केवल वाक्य    4) संकेतार्थी

उत्तर :- 2

9) ‘त्यांचा धाकटा मुलगा काल अतिरेक्यांविरूध्द लढताना शहिद झाला.’ या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा.

   1) अतिरेक्यांविरूध्द  2) लढताना    3) शहीद झाला    4) त्याचा धाकटा मुलगा

उत्तर :- 4

10) ‘मांजर उंदीर पकडते’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) कर्तरी    2) कर्मणी    3) भावे      4) संकर

उत्तर :- 1    

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...