Friday, 1 November 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पुढील जोडयांपैकी कोणती जोडी विरुध्द अर्थाची जोडी बरोबर आहे ते ओळखा.

   1) नम्रता – उध्दटपणा    2) आढयता – गूढता   
   3) हेकेखोरपणा – हट्टीपणा  4) चिडखोरपणा – तापटपणा

उत्तर :- 1

2) स्पष्टीकरणासाठी योग्य म्हण शोधा.
     ‘ज्या धंद्यात विशेष फायदा नाही तो धंदा बंद करावा. म्हणतात ना, ..............’

   1) छक्के पंजे करणे    2) घोडे खाई भाडे
   3) ताकापुरते रामायण    4) दुरून डोंगर साजरे

उत्तर :- 2

3) स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार शोधा.
     एखाद्या क्षुल्लक गोष्टीमुळे अखेरीस सर्व श्रमांवर ................... .

   1) पाणी पाजणे    2) पाणी पाडणे    3) खापर फुटणे    4) सुताने स्वर्गाला जाणे

उत्तर :- 2

4) पुढील वाक्यातील आशय एका शब्दात लिहा. : ‘केलेले उपकार जाणणारी व्यक्ती’

   1) कृतघ्न    2) कृतज्ञ      3) कृपण      4) कृदन्त

उत्तर :- 2

5) शुध्द लेखनाच्या दृष्टीने पुढील शुध्द शब्द ओळखा.

   1) पुर्नजन्म    2) पुनर्विवाह    3) पूनर्जन्म    4) पूर्नविवाह

उत्तर :- 2

6) ‘राम वनात जातो’ या वाक्यात एकूण मूलध्वनी किती आहेत?

   1) सात    2) अकरा      3) बारा      4) चौदा

उत्तर :- 4

7) संधी सोडवा. – ‘सदाचार’

   1) स + दाचार    2) सदा + आचार    3) सत् + आचार    4) सद् + आचार

उत्तर :- 3

8) ‘गोड’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

   1) गोडवा    2) गोड      3) मधुर      4) रसाळ

उत्तर :- 1

9) पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.

   अ) विशेषनामे हे व्यक्तिवाचक असते.
   ब) सामान्यनामे हे जातिवाचक असते.
   क) सामान्यनामे विशेषनामे यांना धार्मिवाचक म्हणतात.
   1) फक्त अ व बरोबर    2) फक्त अ व क चूक
   3) फक्त ब व क बरोबर    4) अ, ब, क तिन्हीही बरोबर

उत्तर :- 4

10) आम्हां मुलांना कोण विचारतो ? वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची अचूक शब्दजात सांगा ?

   1) दर्शक विशेषण  2) संबंधी विशेषण    3) सार्वनामिक विशेषण  4) प्रश्नार्थक विशेषण

उत्तर :- 3

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...