1) ‘विटीदांडू’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
1) वैकल्पिक व्दंव्द 2) समाहार व्दंव्द
3) अव्ययी भाव 4) बहुव्रीही
उत्तर :- 3
2) उद्गारातील भाव सौम्य असतो म्हणून केवलप्रयोगी अव्ययानंतर खालील कोणते विरामचिन्ह वापरले जाते ?
1) अर्धविराम 2) स्वल्पविराम 3) पूर्णविराम 4) अपसारणचिन्ह
उत्तर :- 2
3) ‘मेघासम तो श्याम सावळा’ या वाक्यातील अलंकार ओळखा.
1) रूपक 2) उपमा 3) श्लेष 4) यमक
उत्तर :- 2
4) सिध्द शब्द निवडा.
1) गुरू 2) गुरूने 3) गुरूला 4) गुरूच्या
उत्तर :- 1
5) ‘पानीपतावर सव्वा लाख बांगडी फुटली’ हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते ?
1) अभिधा 2) लक्षणा 3) व्यंजना 4) यापैकी काहीही नाही
उत्तर :- 2
6) पुढीलपैकी कोणता शब्द ‘फूल’ या अर्थाचा नाही?
1) कुसुम 2) सुमन 3) पुष्प 4) पाकळी
उत्तर :- 4
7) ‘पुढारी’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?
1) अनुनय 2) अनुयायी 3) अनुभूती 4) अनुचित
उत्तर :- 2
8) स्पष्टीकरणासाठी म्हण देणे. – ‘अत्यंत गरीब स्थिती असणे.’
1) बुडत्याला काडीचा आधार 2) भुकेला कोंडा निजेला धोंडा
3) रोज मरे त्याला कोण रडे 4) केळीवर नारळी अन् घर चंद्रमौळी
उत्तर :- 4
9) ‘आवाक्याबाहेरची गोष्ट करू पाहणे’ या अर्थाचा खालीलपैकी वाक्प्रचार कोणता ?
1) आकाश फाटणे 2) अस्मान ठेंगणे होणे
3) आभाळ कोसळणे 4) आकाशाला गवसणी घालणे
उत्तर :- 4
10) ‘चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा’ या शब्दसमूहाबद्दल पुढील शब्द वापरतात.
1) अनाग्राही 2) दुराग्रही 3) पंचशील 4) पंचीकृत
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment