Sunday, 24 November 2019

मराठी व्याकरण 10 सराव प्रश्न

1) खालीलपैकी किती हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यये आहेत.

      वा, वावा, आहा, ओहो, अहाहा
   1) तीन    2) चार      3) सर्व      4) दोन

उत्तर :- 3

2) ‘मी निबंध लिहितो’ या वाक्याचा रीती भूतकाळ लिहा.

   1) मी निबंध लिहीत असे      2) मी निबंध लिहिला होता
   3) मी निबंध लिहित होतो      4) मी निबंध लिहिला

उत्तर :- 1

3) ‘गायरान’ या शब्दाचे लिंग ओळखा.

   1) पुल्लिंग    2) स्त्रिलिंग   
   3) नपुंसकलिंग    4) यापैकी नाही

उत्तर :- 3

4) खालील शब्दातून अनेकवचनी शब्द ओळखा.

   1) खेळणे    2) तळे      3) डबे      4) पातेले

उत्तर :- 3

5) पर्यायी उत्तरांत ‘चतुर्थी विभक्तीचे संप्रदान कारकार्थ’ असलेले वाक्य कोणते ?

   1) मी नदीच्या काठाने गेलो    2) तो घरातून बाहेर पडला
   3) तू रामाला पुस्तक दे      4) तो दिवसाचा चालतो

उत्तर :- 3

6) ‘ज्या वाक्यात केवळ एकच उद्देश्य व एकच विधेय असते’ अशा वाक्यास काय म्हणतात ?

   1) संयुक्त वाक्य    2) केवल वाक्य   
   3) मिश्र वाक्य    4) नकारार्थी वाक्य

उत्तर :- 2

7) ‘अलिकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाला काय म्हणता येईल ते सांगा.

   1) उद्देश्य    2) विधेयविस्तार    3) कर्म      4) क्रियापद

उत्तर :- 2

8) सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.

   1) ललिता पाणी आणते      2) ललिताने पाणी आणले
   3) ललिताने पाणी आणावे      4) ललिताने जायचे होते

उत्तर :- 1

9) खालील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा ? – ‘प्रतिवर्षी’

   1) तत्पुरुष समास    2) व्दंव्द समास   
   3) अव्ययीभाव समास    4) व्दिगू समास

उत्तर :- 3

10) योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा.

   1) बघ ! एक रेकॉर्ड, गेली सुध्दा लाव ना    2) “बघ, एक रेकॉर्ड गेली सुध्दा ! लाव ना”
   3) “बघ ! एक रेकॉर्ड गेली सुध्दा – लाव ना”    4) “सोड मला, “तो जोराने ओरडला”

उत्तर :- 3

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...