1) पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. – पाचावर धारण बसणे.
1) मनात संख्या मोजणे 2) पंचप्राण धारण करणे
3) खूप भयभीत होणे 4) ऐसपैस बसणे
उत्तर :- 3
2) तिथी, वार, नक्षत्र, योग, करणा-या पाच घटकांनी युक्त अशा दिनी – वैशिष्टयांची माहिती असणारी पुस्तिका कोणती ?
1) पंचीकरण 2) पंचांग 3) पंचशील 4) पंचीकृती
उत्तर :- 2
3) पुढील शब्दांपैकी व्याकरणदृष्टया योग्य शब्द कोणता ?
1) मनस्थीती 2) मनस्थिति: 3) मन्हस्थिती 4) मन:स्थिती
उत्तर :- 4
4) ट, ठ, ड, ढ, ण हे वर्ण ..................
आहेत.
1) तालव्य 2) अनुनासिक 3) दन्त्य 4) मूर्धन्य
उत्तर :- 4
5) ‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
1) पूर्वरूप संधी 2) पररुप संधी 3) व्यंजन संधी 4) विसर्ग संधी
उत्तर :- 4
6) कुत्र्याने चावा घेतला ? अधोरेखित शब्दाचे नाम कोणते ?
1) कुत्र्या 2) कुत्रा 3) कुत्र्याने 4) कुत्र्याचा
उत्तर :- 2
7) वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणते ?
1) चार 2) पाच 3) सहा 4) सात
उत्तर :- 2
8) पुढीलपैकी अव्ययसाधीत विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?
1) बोलकी बाहुली 2) पुढची गल्ली
3) कापड – दुकान 4) माझे – पुस्तक
उत्तर :- 2
9) वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ...................
1) क्रियापद 2) धातू 3) कर्म 4) कर्ता
उत्तर :- 1
10) खालील विधानातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा.
तो इतका मोठयाने बोलला, की त्याचा आवाज बसला.
1) उद्देशदर्शक 2) कारणदर्शक
3) रीतिदर्शक 4) कालदर्शक
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment