1) विरुध्दार्थी अर्थ लिहा. – ‘अग्रज’
1) वंशज 2) पूर्वज 3) मनोज 4) अनुज
उत्तर :- 4
2) रिकाम्या जागी योग्य म्हण लिहा.
काय नाही आजच्या वर्तमानपत्रात ? लेख, अग्रलेख, वृत्तांत आणि सारे काही. तरी कशाचा प्रभाव मात्र नाही. यालाच म्हणतात,
‘......................’
1) बडा घर अन् पोकळ वासा 2) एक ना धड भाराभार चिंध्या
3) गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता 4) मियाँ मूठभर दाढी हातभर
उत्तर :- 2
3) ‘अल्लाची गाय’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
1) अतिशय धूर्त 2) अतिशय श्रीमंत
3) अतिशय गरीब 4) अतिशय भाग्यवान
उत्तर :- 3
4) ‘हालअपेष्टा सहन करण्याचा गुण’ या शब्दसमूहाबद्दल समूहदर्शक शब्द कोणता ?
1) स्थितप्रज्ञता 2) हिंमत
3) तितिक्षा 4) शौर्य
उत्तर :- 3
5) खालीलपैकी शुध्द शब्द कोणते ?
1) चिंचा, खिंड, टिंब 2) चींच, खींड, टिंब
3) चिंच, खिंड, टिंब 4) चींच, खींड, टींब
उत्तर :- 3
6) मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण मानले जातात?
1) 48 2) 14 3) 34 4) 12
उत्तर :- 2
7) ‘तट्टीका’ या संधीचा विग्रह करा.
1) तत: + टीका 2) त् + ट् + ई + का
3) तत् + टीका 4) त्रा + टीका
उत्तर :- 3
8) योग्य विधाने निवडा.
अ) मूळ शब्दाला व्याकरणात प्रकृती असे म्हणतात.
ब) प्रकृतीला प्रत्यय लागून जे रूप तयार होते त्याला विकृती असे म्हणतात.
1) फक्त ब योग्य 2) फक्त अ योग्य
3) दोन्ही अयोग्य 4) दोन्ही योग्य
उत्तर :- 4
9) ‘गर्जेल तो करीत काय’ या वाक्याचे संबंधी सर्वनाम (अध्याह्यत) ओळखा.
1) गर्जेल 2) तो 3) जो 4) काय
उत्तर :- 3
10) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा विशेषण प्रकार ओळखा.
तिला बनारसी साडी शोभून दिसते.
1) नामसाधित विशेषण 2) सार्वजनिक विशेषण
3) समासघटित विशेषण 4) संबंध विशेषण
उत्तर :- 1
No comments:
Post a Comment