1) थरथर, चुरचुर, खळखळ, सळसळ, ओरड, पीक – हे शब्द कोणते धातू आहेत ?
1) कृतिवाचक धातू 2) अकर्मक धातू 3) उभयविध क्रियापदे 4) सकर्मक क्रियापदे
उत्तर :- 2
2) खालील वाक्य हे कोणत्या ‘स्थानिक क्रियाविशेषणाचे’ उदाहरण आहे.
‘ती काय माती गाते !’
1) विशेषण 2) नाम 3) कृदंत 4) उभयान्वयी अव्यय
उत्तर :- 2
3) दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘आज्ञेबरहुकूम’
1) हेतुवाचक 2) योग्यतावाचक 3) संबंधवाचक 4) भागवाचक
उत्तर :- 2
4) मधूला गोरी नि शिकलेली वधू पाहिजे या वाक्यातील ‘नि’ हे अव्यय कोणते ?
1) विकल्प बोधक 2) समुच्चय बोधक 3) परिणाम बोधक 4) न्युनत्व बोधक
उत्तर :- 2
5) काल म्हणे मुलांनी गडबड केली. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार सांगा.
1) संबोधनदर्शक 2) व्यर्थ उद्गारवाची 3) संमती दर्शक 4) यापैकी नाही
उत्तर :- 2
6) जेव्हा वर्तमान काळाबरोबर क्रिया करण्याचा हेतू समजतो तेव्हा तो .............. वर्तमानकाळ होतो.
1) पूर्ण वर्तमानकाळ 2) रीती वर्तमानकाळ
3) अपूर्ण वर्तमानकाळ 4) उद्देश वर्तमानकाळ
उत्तर :- 4
7) पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप आ – कारांत होते.
ब) अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात ए – कारांत होते.
1) केवळ अ बरोबर 2) केवळ ब बरोबर 3) अ आणि ब बरोबर 4) अ आणि ब चूक
उत्तर :- 3
8) खालीलपैकी अनेक वचनी नामे ओळखा.
अ) रोमांच ब) हाल क) शहारे ड) डोहाळे
1) फक्त क आणि ड 2) फक्त अ, क आणि ड 3) वरील सर्व 4) फक्त अ आणि ब
उत्तर :- 3
9) कर्मणी प्रयोगात कर्म हे ..................... विभक्तीत असते.
1) प्रथमा 2) व्दितीया 3) तृतीया 4) चतुर्थी
उत्तर :- 1
10) ‘माणूस जातो. त्याची कीर्ति मागे उरते.’ या वाक्याचे संयुक्त वाक्य कसे होईल ?
1) माणूस गेला तरी त्याची कीर्ति मागे उरते 2) माणूस जातो. कीर्ति उरते
3) कीर्ति उरली, माणूस उरला 4) यापैकी काहीही नाही
उत्तर :- 1
No comments:
Post a Comment