1) पर्यायी उत्तरांतून योग्य ते उत्तर सांगा? ‘ईश्वरनिर्मित’
1) नत्रतत्पुरुष समास 2) तृतीया तत्पुरुष समास
3) प्रादी समास 4) कर्मधारय समास
उत्तर :- 2
2) बोलणा-याच्या तोंडचे शब्द सूचित करण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर करतात ?
1) एकेरी अवतरण (´ ´) 2) दुहेरी अवतरण (“ ”)
3) उद्गार चिन्ह ( ! ) 4) स्वल्प विराम ( , )
उत्तर :- 2
3) ‘अणूरेणूहून थोकडा | तुका आकाशा एवढा’ यातील अलंकार ओळखा.
1) चेतनगुणोक्ती 2) भ्रांतिमान 3) विरोधाभास 4) सार
उत्तर :- 3
4) अभ्यस्त शब्द ओळखा.
1) बारीक सारीक 2) बारकुडा 3) बारकावा 4) बारावा
उत्तर :- 1
5) ‘गंगेत गवळयांची वसती’ या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे ?
1) अभिधा 2) लक्षणा 3) व्यंजना 4) योगरूढ
उत्तर :- 2
6) ‘पथ’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
1) रस्ता 2) वळण 3) रूळ 4) पूल
उत्तर :- 1
7) ‘भंग’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द सांगा.
1) भग्न 2) निर्भय 3) सभंग 4) अभंग
उत्तर :- 4
8) ‘पिकते तेथे विकत नाही’ या म्हणीचा अचूक पर्याय कोणता ?
1) मिळेल त्यावर संतोष मानणे 2) निर्मितीच्या ठिकाणी मूल्य नसते
3) कुठेही काही विकले जात नाही 4) कुठेही काहीही पिकते
उत्तर :- 2
9) खालीलपैकी ‘मारामारी करणे’ हा अर्थ कोणत्या वाक्प्रचाराचा आहे ?
1) दोनाचे चार हात होणे 2) हात पसरणे
3) हाती हात घेणे 4) दोन हात करणे
उत्तर :- 4
10) खालील विधानातील अधोरेखित शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता ?
पंधरा दिवसातून एकदा भरणारी अशी आमची बैठक असते.
1) दैनिक 2) वार्षिक 3) पाक्षिक 4) मासिक
उत्तर :- 3
No comments:
Post a Comment