1) समानार्थी वाक्प्रचार द्या. - ‘ब्रभा करणे’
1) काखा वर करणे 2) खो घालणे
3) टाके ढिले करणे 4) डांगोरे पिटणे
उत्तर :- 4
2) शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. – ‘फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे’
1) शिपाईगडी 2) बाजारबुणगे
3) सेवेकरी 4) भोई
उत्तर :- 2
3) प्रचलित शुध्दलेखनानुसार चुकीचा शब्द कोणता ?
1) लघुकथा 2) गतिमान
3) वधुपरीक्षा 4) महीपाल
उत्तर :- 3
4) एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की, त्या संयुक्त व्यंजनाला ...................... म्हणतात.
1) अनुनासिक 2) व्दित्त
3) घर्षक 4) अल्पप्रमाण
उत्तर :- 2
5) ‘कवीश्वर’ या शब्दातील संधीचा प्रकार कोणता ?
1) विसर्गसंधी 2) स्वरसंधी
3) व्यंजनसंधी 4) पररूप संधी
उत्तर :- 2
6) पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे?
‘विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला’
1) उत्तीर्ण 2) परीक्षेत 3) झाला 4) विश्वाय
उत्तर :- 4
7) पुढील वाक्यातील सर्वनाम कोणते ते सांगा.
ती मुलगी चांगली गाते.
1) मुलगी 2) ती 3) गाते 4) चांगली
उत्तर :- 2
8) हल्ली सज्जन मित्र मिळणे कठीण झाले आहे. – अधोरेखित शब्दांचे विशेषण प्रकार ओळखा.
1) साधित विशेषण 2) परिणाम दर्शक विशेषण
3) नामसाधित विशेषण 4) अविकारी विशेषण
उत्तर :- 3
9) ‘मला आता काम करवते’ या वाक्यातील करवते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ?
1) शक्य क्रियापद 2) प्रयोजक क्रियापद 3) अनियमित क्रियापद 4) साधित क्रियापद
उत्तर :- 1
10) जोडया जुळवा.
अ) नामसाधित क्रियाविशेषणे i) निजल्यावर, खेळताना
ब) विशेषणसाधित क्रियाविशेषणे ii) दररोज, शास्त्रदृष्टया
क) धातुसाधित क्रियाविशेषणे iii) सकाळी, प्रथमत:
ड) समासघटित क्रियाविशेषणे iv) मोटयाने, सर्वत्
र
अ ब क ड
1) iii iv i ii
2) iii i iv ii
3) iv ii iii i
4) i iii iv ii
उत्तर :- 1
No comments:
Post a Comment