Monday 18 November 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) धातू ओळखण्याचे अक्षर कोणते?
   1) नी      2) णा      3) ने      4) णे

उत्तर :- 4

2) इकडे, मध्ये, रातोरात, आज इ. ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत ?

   अ) स्थलवाचक विशेषण      ब) कालवाचक क्रियाविशेषण
   क) संख्यावाचक क्रियाविशेषण    ड) रीतिवाचक क्रियाविशेषण

   1) अ व ब बरोबर  2) अ, क बरोबर    3) ब, ड बरोबर    4) अ, ड बरोबर

उत्तर :- 1

3) खालीलपैकी चतुर्थी विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय ओळखा.

   अ) प्रती    ब) स्तव      क) समोर      ड) सह
   1) अ आणि ब    2) क आणि ड    3) ब आणि ड    4) अ आणि क

उत्तर :- 1

4) ‘उभयान्वयी अव्ययाचा’ विचार करताना पुढील बाबींचा विचार करावा लागेल.

   अ) दोन किंवा अधिक वाक्ये जोडणा-या विकारी शब्दांना उभयान्वयी अव्यये म्हणतात.
   ब) प्रधानसुचक व गौणत्वसूचक असे दोन मुख्य प्रकार उभयान्वयी अव्ययात आहेत.
   क) ‘अन’, ‘आणखी’, ‘आणि’ हे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाची उदाहरणे आहेत.
   ड) ‘विजयने उत्तम अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले.’
        या वाक्यातून न्यूनत्वबोधक उभयान्वयी वाक्य आहे.

   1) फक्त अ    2) अ, ब, क    3) ब, क      4) ब, क, ड

उत्तर :- 3

5) छे, छट्, ऊ:, छेछे, च
     वरीलपैकी किती विरोधीदर्शक अव्यये आहेत.
   1) वरील सर्व    2) चार      3) पाच      4) तीन

उत्तर :- 1

6) ‘सुरेश गीत गात होता’ काळ ओळखा.

   1) पूर्ण भूतकाळ      2) अपूर्ण भूतकाळ   
   3) चालू भूतकाळ    4) सामान्य भूतकाळ

उत्तर :- 2

7) पुढे काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे ‍दिली आहेत.

      पती-पत्नी, दीर-जाऊ, रेडा-म्हैस, तर खोंड ?
   1) कालवड    2) भाटी      3) लांडोर    4) गाय

उत्तर :- 1

8) खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा.

   1) लाटा    2) झरा      3) धारा      4) गारा

उत्तर :- 2

9) खालील विधानातील अधोरेखित शब्दाचा चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ कोणता ?

     ‘लाठीच्या एकेका तडाक्यास त्याने एकेक इसम लोळविला.’
   1) कर्ता    2) कर्म      3) कारण      4) अपादान

उत्तर :- 3

10) तू काही आता लहान नाहीस. यासाठी खालील पर्यायातून होकारार्थी वाक्य निवडा.

   1) तू आता मोठा झाला आहेस    2) तू आता लहान उरला नाहीस
   3) तू केव्हा मोठा होणार आहेस    4) मोठा हो जरा आता तरी

उत्तर :- 1

1 comment:

  1. चतुर्थी चा कारकार्थ "संप्रदान" आहे

    ReplyDelete