1) माणसाने स्वार्थ व ............... चा विचार करावा. स्वार्थ शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?
1) आप्पलपोटी 2) प्रपंच
3) परमार्थ 4) पोटार्थ
उत्तर :- 3
2) समानार्थी म्हण शोधा. ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’
1) खाऊ जाणे तो पचवू जाणे 2) जशी कुडी तशी पुडी
3) यापैकी नाही 4) अंथरुण पाहून पाय पसरावे
उत्तर :- 3
3) ‘धिंडवडे निघणे’ या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता ?
1) फजिती होणे 2) मिरवणूक निघणे
3) वडे तळणे 4) बोबडी वळणे
उत्तर :- 1
4) ‘हालअपेष्टा सहन करण्याचा गुण’ चा शब्दसमूहासाठी एक शब्द शोधा.
1) तितिक्षा 2) गरीब
3) दयाळू 4) मायाळू
उत्तर :- 1
5) शुध्द शब्दाचा पर्याय निवडा.
1) महात्म्य 2) माहात्म्य
3) माहात्म 4) महात्म
उत्तर :- 2
6) पुढीलपैकी स्पर्श व्यंजने कोणती आहेत?
1) अ – आ 2) च – छ
3) य – र 4) श – ष
उत्तर :- 2
7) नाविक शब्दाचा विग्रह करा.
1) नौ + इक = नाविक 2) ना + विक = नाविक
3) नाव + इक = नाविक 4) नावी + क = नाविक
उत्तर :- 1
8) एकाच जातीच्या पदार्थामधील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात ?
1) सर्वनाम 2) विशेषनाम
3) सामान्यनाम 4) भाववाचकनाम
उत्तर :- 3
9) ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ – यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ?
1) सामान्य 2) संबंधी व दर्शक
3) पुरुषवाचक व दर्शक 4) संबंधी व सामान्य
उत्तर :- 2
10) ‘व्दिगुणित आनंद’ या शब्दातील ‘व्दिगुणित’ शब्द ................. संख्याविशेषण आहे.
1) क्रमवाचक 2) आवृत्तीवाचक
3) अनिश्चित 4) गणनावाचक
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment