1) दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
कोणी कोणास हसू नये
1) दर्शक सर्वनाम 2) संबंधी सर्वनाम
3) अनिश्चित सर्वनाम 4) आत्मवाचक सर्वनाम
उत्तर :- 3
2) ‘माझे पुस्तक’ शब्दातील ‘माझे’ हा शब्द .................. आहे.
1) सार्वनामिक विशेषण 2) क्रियापद 3) नाम 4) अव्यय
उत्तर :- 1
3) ‘तो रडता रडता थांबला’, हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे ?
1) विशेषण 2) शब्दयोगी अव्यय
3) केवलप्रयोगी अव्यय 4) कृदन्त
उत्तर :- 4
4) पुढील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. - मोठयाने ओरडू नकोस.
1) नामसाधित क्रियाविशेषण अव्यय 2) विशेषणसाधित क्रियाविशेषण अव्यय
3) धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय 4) अव्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय
उत्तर :- 2
5) योग्य विधाने निवडा.
अ) शुध्द शब्दयोगी अव्यय हे नामाला जोडून येतात.
ब) शुध्द शब्दयोगी अव्यय लागणा-या नामाचे सामान्यरूप होते.
1) दोन्ही योग्य 2) फक्त अ योग्य 3) फक्त ब योग्य 4) अ व ब अयोग्य
उत्तर :- 2
6) खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘माईंनी खूप त्रास काढला, म्हणून तर आता ते सुखात जगताहेत.’
1) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय 2) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
3) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय 4) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय
उत्तर :- 3
7) यवं, फक्कड, खाशी, छान, वाहवा, भले – यापैकी किती विरोधीदर्शक अव्यये आहेत.
1) पाच 2) वरील सर्व 3) तीन 4) चार
उत्तर :- 2
8) वेदश्री चित्रे काढीत आहे – काळ ओळखा.
1) अपूर्ण वर्तमानकाळ 2) पूर्ण वर्तमानकाळ 3) रीती वर्तमानकाळ 4) उद्देश्य वर्तमानकाळ
उत्तर :- 1
9) पुढीलपैकी लिंग वचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता ?
1) सुंदर 2) कडू 3) रानटी 4) शहाणा
उत्तर :- 4
10) आंबे – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.
1) आंबा 2) आंबे 3) आंबी 4) आंबू
उत्तर :- 1
No comments:
Post a Comment