Monday, 11 November 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) ‘क्षुध्+ पीडा’ याची योग्य संधी कोणती?
   1) क्षुत्पीडा    2) क्षुतपीडा    3) क्षुत्पिडा    4) क्षुत्‍पिडा

उत्तर :- 1

2) पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामांचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे  ?

   1) मी आत्ताच नगरहून आलो    2) आमची बेबी आता कॉलेजात जाते
   3) माधुरी उद्या मुंबईला जाईल    4) शेजारची तारा यंदा बी.ए. झाली

उत्तर :- 3

3) ‘ज्याला कर नाही त्याला डर कशाला ?’ सर्वनामाचा अधोरेखित प्रकार सांगा.

   1) दर्शक सर्वनाम  2) संबंधी सर्वनाम    3) अनिश्चित सर्वनाम  4) आत्मवाचक सर्वनाम

उत्तर :- 2

4) विशेषण ज्या नामबद्दल, विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला ...................... असे म्हणतात.

   1) विशेष्य    2) अव्यय सदृश्य सर्वनाम
   3) धातुसाधित    4) अव्ययसाधीत

उत्तर :- 1

5) पुढे दिलेल्या वाक्यांमधील भावकर्तृक क्रियापद असलेले वाक्य ओळखा.

   1) आई बाळाला हसविते        2) आईच्या आठवणीने प्रज्ञाचे डोळे पाणावले
   3) आई घरी पोचण्यापूर्वीच सांजावले    4) आईने स्वत:च जेवण बनविले

उत्तर :- 3

6) ‘जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

   1) स्थलवाचक क्रियाविशेषण वाक्य      2) कालवाचक क्रियाविशेषण वाक्य
   3) रीतिवाचक क्रियाविशेषण वाक्य      4) कार्यकारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य

उत्तर :- 2

7) दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

     स्तव

   1) तुलनावाचक      2) हेतुवाचक    3) दिक्वाचक    4) विरोधवाचक

उत्तर :- 2

8) पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ?
    ‘अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश’

   1) परिणामबोधक    2) स्वरूपबोधक    3) कारणबोधक    4) विकल्पबोधक

उत्तर :- 2

9) पुढील शब्द कोणत्या शब्दजातीतील ओळखा. – ‘फक्कड’

   1) उभयान्वयी      2) केवलप्रयोगी    3) सर्वनाम    4) ‍क्रियापद

उत्तर :- 2

10) ‘तो नेहमीच लवकर येतो’ या वाक्यातील काळ ओळखा.

   1) वर्तमानकाळ      2) अपूर्ण वर्तमानकाळ
   3) पूर्ण वर्तमान काळ    4) रीतिवर्तमान काळ

उत्तर :- 4

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...