Friday, 1 November 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) विभक्ती प्रत्यय लागल्याने शब्दाच्या अंत्य अक्षरात विकार होण्याच्या क्रियेला काय म्हणतात?

   1) सामान्यरूप      2) संधी      3) कारकार्थ    4) उपपदार्थ

उत्तर :- 1

2) ‘मी नदीच्या काठाने गेलो.’ अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा.

   1) करण      2) अधिकरण    3) कर्ता      4) कर्म

उत्तर :- 2

3) ‘केवल वाक्य’ तयार करा.

   अ) अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळयाचा नेम धरला.

   ब) अर्जुनाने बाण सोडला.
   1) अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळयाचा नेम धरून बाण सोडला.
   2) अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळयाचा नेम धरला आणि बाण सोडला.
   3) अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळयाचा नेम धरल्यानंतर बाण सोडला.
   4) अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळयाचा नेम धरला आणि मगच बाण सोडला.

उत्तर :- 1

4) संयुक्त वाक्याचे पृथक्करण करा :

     ‘मला राजाश्रय मिळाला होता ; पण राजकृपा मात्र माझ्या वाटयाला आली नव्हती.

   1) आली नव्हती – उद्देश, माझ्या वाटयाला – विधेयपूरक, पण राजकृपा मात्र – कर्म विस्तार, मिळाला होता – विधेय विस्तार,
        मला राजाश्रय – कर्म.

   2) पण राजाश्रय मात्र – उद्देश, मला राजाश्रय मिळाला होता – कर्मपूरक, माझ्या वाटयाला – उद्देश विस्तार, आली नव्हती –
        विधेय.

   3) पण – उभयान्वयी अव्यय, राजाश्रय, राजकृपा – उद्देश, मला – कर्म, मिळाला होता, आली नव्हती – विधेय, माझ्या वाटयाला
        – विधेय विस्तार

   4) मला राजाश्रय – उद्देश, मिळाला होता – कर्मपूरक, पण राजकृपा मात्र -  पूरक, माझ्या वाटयाला – कर्म विस्तार, आली नव्हती
     – विधेय विस्तार

उत्तर :- 3

5) प्रयोगाचे रूपांतर करा. – मी चहा घेतला. (कर्मणी करा)

   1) मी चहा घेणार होतो.      2) माझ्याकडून चहा घेतला गेला.
   3) चहा घेणे बरे असते.      4) कुणाकडूनही चहा घ्यावा.

उत्तर :- 2

6) ‘कमलनयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला.’ अधोरेखित शब्दाचा समास ओळखा.

   1) व्दंव्द समास    2) बहुव्रीही समास    3) अव्ययीभाव समास    4) तत्पुरुष समास

उत्तर :- 2

7) दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?

   1) योग्य चिन्ह    2) संयोग चिन्ह    3) योग चिन्ह      4) अर्ध विराम

उत्तर :- 2

8) लहानपण देगा देवा I मुंगी साखरेचा रवा I,

     ऐरावत रत्न थोर I त्यासी अंकुशाचा मार II

     वरील कडव्यातील अलंकार ओळखा.

   1) यमक अलंकार  2) अनुप्रास अलंकार  3) रूपक अलंकार      4) दृष्टांत अलंकार

उत्तर :- 4

9) भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना .................... शब्द म्हणतात.
     योग्य पर्यायाची निवड करून गाळलेली जागा भरा.

   1) सिध्द    2) साधित    3) उपसर्गघटित      4) प्रत्ययघटित

उत्तर :- 1

10) ‘आम्ही गहू खातो’ या वाक्याचा अर्थ कोणत्या शब्दशक्तीव्दारे समजून घ्यावा लागतो ?

   1) अर्थीव्यंजना    2) अमिभधा    3) व्यंजना      4) लक्षणा

उत्तर :- 4

No comments:

Post a Comment