Saturday, 30 November 2019

चालू घडामोडी प्रश्नसंच 30/11/2019

📌भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 2019 साली ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या सुरूवातीस त्याचा रिमोट सेन्सिंग उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. त्या उपग्रहाचे नाव काय आहे?

(A) कार्टोसॅट-1
(B) कार्टोसॅट-2
(C) कार्टोसॅट-3✅✅✅
(D) कार्टोसॅट-4

📌कोणत्या राज्य सरकारने "कलवी तोलाईकाच्ची" नावाने विशेष शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी सुरू केली?

(A) केरळ
(B) तेलंगणा
(C) आंध्रप्रदेश
(D) तामिळनाडू✅✅✅

📌25 ऑगस्ट 2019 रोजी, द्वैपक्षीय संबंध दृढ करण्यासाठीच्या प्रयत्नांच्या सन्मांनार्थ नरेंद्र मोदी यांना ‘________ ऑर्डर - फर्स्ट क्लास’ हा सन्मान देण्यात आला.

(A) संयुक्त अरब अमिरात
(B) बहरीन✅✅✅
(C) कतार
(D) सौदी अरब

📌कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी 'क्यूआर कोड स्कीम' (हिम्मत प्लस) नावाचा उपक्रम सुरू केला?

(A) पंजाब
(B) जम्मू व काश्मीर
(C) गोवा
(D) दिल्ली✅✅✅

📌कोणते शहर इंडोनेशिया या देशाचे नवे राजधानी शहर असणार आहे?

(A) पूर्व कालीमंतन, बोर्निओ✅✅✅
(B) ग्रेटर सुरबाया
(C) बानदंग
(D) मेदान

📌कोणत्या दोन रेल्वे स्थानकादरम्यान पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस सुरू करण्यात आली?

(A) दिल्ली आणि मुंबई
(B) आग्रा आणि दिल्ली
(C) मैसूर आणि उदयपूर✅✅✅
(D) उदयपूर आणि बंगळुरू

📌कोणत्या राज्य सरकारने लेमरू हत्ती वन प्रकल्प स्थापनेसंबंधी प्रस्तावाला मान्यता दिली?

(A) मध्यप्रदेश
(B) छत्तीसगड✅✅✅
(C) ओडिशा
(D) उत्तरप्रदेश

📌दिल्ली जिल्हा क्रिकेट संघने (DDCA) _ याचे अरुण जेटली स्टेडियम असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.

(A) वानखेडे स्टेडियम
(B) आयएस बिंद्रा स्टेडियम
(C) ब्रेबॉर्न स्टेडियम
(D) फिरोज शाह कोटला स्टेडियम✅✅✅

'माजी नेव्ही चीफ अ‍ॅडमिरल सुशील कुमार' काळाच्या पडद्याआड

🎯२७ नोव्हेंबर २०१९ रोजी माजी नेव्ही चीफ अ‍ॅडमिरल सुशील कुमार यांचे निधन

🎯नवी दिल्लीतील लष्करी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली

🎯ते ७९ वर्षांचे होते

🌞सुशील कुमार यांचा अल्प परिचय :-

🎯अ‍ॅडमिरल सुशील कुमार यांच्यावर नौदल स्टाफच्या १६ व्या प्रमुख पदाचा कार्यभार होता

🌞नौदल प्रमुख कार्यकाळ :-

🎯१९९८ ते २००१

🎯१९९९ च्या कारगिल संघर्षात त्यांच्याकडून नौदल कारवायांवर देखरेख

🌞दहशतवादाविरुद्ध कारवाया :-

🎯२०००-२००१ संसद हल्ला घटनेनंतर भारताकडून 'ऑपरेशन पराक्रम' योजना

🎯'चीफ ऑफ स्टाफ कमिटी' अध्यक्ष म्हणून कार्य

*ग्रंथ संपदा :-*

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर आधारित 'अ प्राइम मिनिस्टर टू रिमेम्बर - मेमरीज ऑफ अ मिलिटरी चीफ' (A Prime Minister to Remember - Memories of a Military Chief) नावाने पुस्तक लेखन

पुस्तकात रणनीतिकरित्या डावपेच नुकसानीचे रूपांतर मोठ्या विजयात करण्याचे श्रेय सुशील कुमार यांनी श्री. वाजपेयी यांना दिले

चालू घडामोडी वन लाइनर्स, 30 नोव्हेंबर 2019.

❇ 29 नोव्हेंबर: आंतरराष्ट्रीय पॅलेस्टाईन लोकांसह एकता दिन

❇ जगप्रसिद्ध रॉक गिर्यारोहक ब्रॅड गोब्रेट निघून गेला

❇ चंदीगडमध्ये तिसरा सैनिकी साहित्य महोत्सव आयोजित केला जाईल

❇ मूडीची अपेक्षा आहे की केंद्राची वित्तीय तूट 3.7% पर्यंत वाढेल

❇ भारतीय सैन्याने एमपीमध्ये यशस्वीरित्या चाचणी-अयशस्वी 2 स्पाइक एलआर मिसाईलची चाचणी केली

❇ भारताने श्रीलंकेला अर्थव्यवस्था वाढविण्यासाठी 400 दशलक्ष डॉलर्स इतक्या पतपुरवठा केला

❇ पी के अग्रवाल सीआयबीजेओ, वर्ल्ड ज्वेलरी कन्फेडरेशनचे उपाध्यक्ष म्हणून निवडले

❇ बेन स्टोक्स यांना स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशनमध्ये स्पोर्ट्समन ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आले आहे

❇ दिना आशर-स्मिथ स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशनमध्ये स्पोर्ट्स वूमन ऑफ दी इयर म्हणून निवडली गेली

❇ एमएचआरडीने मुलांसाठी कुंभ, गरम पहाड आणि दिल्ली की बुलबुल नामक पुस्तके सुरू केली.

❇ तामिळ अभिनेता आणि रंगमंच कलाकार बाला सिंग यांचे निधन

❇ 2023 पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा ओडिशा

❇ प्रसिद्ध व्यंगचित्रकार सुधीर डार यांचे नुकतेच निधन झाले

❇ टाटा कम्युनिकेशन बोर्डने एस लक्ष्मीनारायणन यांना एमडी आणि सीईओ म्हणून नेमणूक केली

❇ युरोपियन युनियनच्या विधिमंडळाने हवामान आणीबाणी जाहीर केली आहे

❇ उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवड केली

❇ अरुण कुमार शुक्ला यांना हिंदुस्तान कॉपर लिमिटेडचे ​​सीएमडी नियुक्त केले

❇ डीजीएफएलचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वाजिनाथ गवर्शट्टी यांची नियुक्ती

❇ थायलंड जागतिक वारसा समितीच्या सदस्यासाठी निवडली गेली

❇ ब्राझीलमध्ये 18 वे जागतिक पवन ऊर्जा परिषद आयोजित

❇ पीटर राय वर्ल्ड पवन ऊर्जा संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले

❇ डॉ. जामी हुसेन यांची जागतिक पवन ऊर्जा संघटना व्ही. पी. म्हणून निवड झाली

❇ सौदी अरेबिया युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीत निवडली गेली

❇ रणबीर गंगवा हरियाणा विधानसभेचे उपसभापती निवडले

❇ उद्धव ठाकरे औपचारिकपणे मुख्यमंत्रीपदाचे कार्यभार स्वीकारतील

❇ आयआयटी बॉम्बेने क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2020 मध्ये 34 वे स्थान मिळविले

❇ आयआयटी दिल्ली क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2020 मध्ये 43 व्या स्थानावर आहे

❇ आयआयटी मद्रासने क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2020 मध्ये 50 वे स्थान मिळविले

❇ आयआयटी खडगपूरने क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2020 मध्ये 56 वे स्थान मिळविले

❇ आयआयटी कानपूरने क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2020 मध्ये 65 वे स्थान मिळविले

❇ क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2020 मध्ये दिल्ली विद्यापीठाचा 67 वा क्रमांक आहे

❇ आयआयटी रुड़की क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2020 मध्ये 90 व्या स्थानावर आहे

❇ आयआयटी गुवाहाटीने क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2020 मध्ये 112 वे क्रमांक मिळविला आहे

❇ क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2020 मध्ये मुंबई विद्यापीठाचा 177 वा क्रमांक आहे

❇ आयआयटी इंदौरने क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2020 मध्ये 188 वे स्थान मिळविला

❇ कृष्णा यादव डॉ डॉ. आर. आंबेडकर पुरस्कार 2019 चा सन्मान

❇ कवी अकीथम यांना 55 व्या ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले

❇ IFFI 2019 ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार’ लिजो जोस पेलिसरी यांना देण्यात आला

❇ आयएफएफआय 2019 सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) पुरस्कार सेऊ जॉर्ज यांना देण्यात आला

❇ IFFI 2019 सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला) पुरस्कार उषा जाधव यांना देण्यात आला

❇ आयएफएफआय 2019 स्पेशल ज्युरी अवॉर्ड पेमा टसेडेन यांना देण्यात आला

❇ 2019 गोल्डन पीकॉक अवॉर्डला पार्टिकल्स मध्ये संदर्भित करण्यात आला

❇ मँचेस्टर सिटी मालक भारताच्या मुंबई शहर एफसीमध्ये 65% साठा खरेदी करतील

❇ श्रीनगर-जम्मू मेट्रो प्रकल्प सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू होईल

❇ हैदराबाद 38 वे रोव्हिंग नॅशनल चँपियनशिप आयोजित करेल

❇ सायलेंट हीरोजने 5 वा उषा दिव्यांग क्रिकेट लीग करंडक जिंकला

❇ फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी बॅग्स सर्वोत्कृष्ट प्लेमेकर पुरस्कार 2019

❇ लुई-मेरीला वर्ल्ड स्क्वॉश फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले

❇ दक्षिण आशियाई खेळांचे आयोजन काठमांडू, नेपाळ येथे होणार आहे.

मालदीवचे माजी अध्यक्ष गयूम यांना ५ वर्षांचा कारावास



🔺 यामीन यांनी २०१३ ते २०१८ या काळात मालेचे नेतृत्व केले.

◾️माले : मालदीवचे माजी अध्यक्ष यामीन अब्दुल गयूम यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या (मनी लाँडरिंग) आरोपाखाली दोषी ठरवून देशातील एका न्यायालयाने त्यांना ५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. गयूम यांनी ५० लाख डॉलरचा दंड भरावा, असाही आदेश पाच सदस्यांच्या एका फौजदारी न्यायालयाने दिला. गुरुवारी दिलेल्या आदेशानुसार, न्यायालयाने यामीन यांनी सरकारी खजिन्यातील १० लाख डॉलर रकमेचा वैयक्तिक कामासाठी गैरव्यवहार केल्याचा निर्णय न्यायालयाने दिला. यामीन यांनी २०१३ ते २०१८ या काळात मालेचे नेतृत्व केले. त्यांच्या कारकीर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचार, माध्यमांची मुस्कटदाबी करणे, आणि राजकीय विरोधकांना हद्दपार करणे असे आरोप लावण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोली यांनी त्यांचा पराभव केला होता.

Friday, 29 November 2019

नव्या सरकारचा "किमान समान कार्यक्रम"

शिक्षण
- राज्यातील शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार
- राज्यातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आणि आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्जाची सुविधा देणार!!

बेरोजगारी
- राज्यातील बेरोजगारांसाठी त्वरित रखडलेल्या सरकारी नोकऱ्यांची प्रक्रिया मार्गी लावणार
- सुशिक्षित तरुण बेरोजगारांना शिष्यवृत्ती सुविधा राबवणार
- महाराष्ट्रातील नोकऱ्यांमध्ये ८०% आरक्षण हे स्थानिकांसाठी मिळावं याकरिता राज्यात नवा कायदा अमलात आणणार

महिला
- महिला सुरक्षेचा मुद्दा हा या सरकारचा सर्वात महत्वाचा घटक असेल
- आर्थिकरित्या मागास कुटुंबातील विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाची सुविधा
- नोकरदार तरुण युवतींसाठी तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह उभारणार
- अंगणवाडी सेविकांच्या मासिक भत्यात अथवा मानधनात वाढ करणार आणि त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवणार
- महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत महिला बचत गटांच्या सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार

शेतकरी
- अवकाळी पावसामुळे दुष्काळाने ग्रासलेल्या भागांमध्ये जनतेच्या सेवेसाठी तातडीने आवश्यक ते सहकार्य करणार
- राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमुक्त करणार
- दुष्काळात पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मिळावा यासाठी संबंधीत यंत्रणेत आवश्यक ते बदल करणार
- पिकाचा हमीभाव ठरवण्यासाठी आवश्यक त्या तरतुदी अमलात आणणार
- दुष्काळग्रस्त भागात पाण्यासाठी शाश्वत जलसाठा मोहीम राबवणार

शहरी विकास
- शहरी भागातील रस्तेबांधणीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंमलात आणणार तसेच नगरपरिषद,नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या रस्त्यांच्या सुधारणीसाठी अथवा डागडुजीसाठी विशेष आर्थिक अनुदानाची तरतूद करणार
- मुंबईसह सबंध महाराष्ट्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत येणाऱ्या गोरगरिबांना ५०० चौ.फूट घरे मोफत दिली जाणार

उद्योग
- महाराष्ट्रातील गुंतवणूक आणि नवीन उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष सवलती राबवणार तसंच उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठीची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ आणि सरलीकृत करणार
- महाराष्ट्रात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या उद्योगाना चालना मिळावी यासाठी त्याच्या योजनांमध्ये आवश्यक सुधारणा करणार

पर्यटनकला आणि संस्कृती
- महाराष्ट्रातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सर्व ठिकाणी पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार

सामाजिक न्याय
- महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि जमाती,इतर मागासवर्गीय, धनगर,बलुतेदार आदी जनतेच्या अन्न, वस्त्र,निवारा,शिक्षण,आरोग्य आणि रोजगार या मूलभूत गरजांच्या सोयीसुविधा संविधानातील तरतुदींप्रमाणे अग्रक्रमाने पुरवणार
- महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक वर्गातील सामाजिक,शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार तसंच त्यांच्या सुरक्षेसाठीही विशेष काळजी घेणार

इतर महत्वाच्या तरतुदी
- जेष्ठ नागरिकांच्या बाबतीत विशेष सुविधा राबवणार
- अन्न आणि औषध या बाबतीतल्या सुरक्षेच्या प्रश्नी दुर्लक्ष कारणाऱ्यांविरुद्ध किंवा नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कडक शिक्षेची तरतूद करणार
- सामान्य नागरिकांना केवळ दहा रुपयात स्वच्छ आणि परवडणारं जेवण/अन्न पुरवणार

झटपट 30 प्रश्न उत्तरे

1) ‘ग्लोबल टेररिझम इंडेक्स’ कोणत्या संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे?
उत्तर : इंस्टीट्यूट फॉर इकनॉमिक्स अँड पीस

2) ‘जागतिक तत्वज्ञान दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : नोव्हेंबर महिन्याचा तिसरा गुरुवार

3) यावर्षी ‘इंडिया फॉर ह्युमॅनिटी - जयपूर फूट’ कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

4) "अरुंधती सुवर्ण योजना" कोणत्या राज्यसरकारद्वारे लागू केली जाणार आहे?
उत्तर : आसाम सरकार

5) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी कोणत्या व्यक्तीला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले?
उत्तर : किरण मजुमदार-शॉ

6) नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड प्रकल्प कधीपासून कार्यरत केला जाणार आहे?
उत्तर : 31 डिसेंबर 2020

7) राष्ट्रीय सोवा रिग्पा संस्था (NISR) याची स्थापना कोठे होणार आहे?
उत्तर : लडाख

8) ‘मिस्टर युनिव्हर्स 2019’ हा किताब कोणी जिंकला?
उत्तर : चित्रेश नतेसन

9) "डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट" महोत्सवाचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : वाराणसी

10) ऑक्सफोर्ड डिक्शनरीने कोणत्या शब्दाची 'वर्ड ऑफ द इयर' म्हणून निवड केली?
उत्तर : Climate Emergency

1. तीन वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन होतो?

 30 अंश

 60 अंश

 90 अंश

 10 अंश

उत्तर : 90 अंश

2. लिप वर्ष दर —– वर्षांनी येते.

 2

 4

 3

 5

उत्तर :4

 3. 1/9+1/12=?

 1/36

 7/36

 2/36

 2/21

उत्तर :7/36

 4. पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातून जात नाही?

 रा.म.3

 रा.म.4

 रा.म.5

 रा.म.6

उत्तर :रा.म.5

 5. महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?

 औरंगाबाद

 अमरावती

 पुणे

 कोकण

उत्तर :औरंगाबाद

 6. भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात कुरुक्षेत्र आहे?

 पंजाब

 उत्तरप्रदेश

 हरियाणा

 हिमाचलप्रदेश

उत्तर :हरियाणा

 7. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशातून वाहते?

 तापी

 महानदी

 गोदावरी

 चंबळ

उत्तर :तापी

 8. अंकलेश्वर खनिजतेल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

 महाराष्ट्र

 आसाम

 मध्यप्रदेश

 गुजरात

उत्तर :गुजरात

 9. खालीलपैकी कोणत्या गोष्टीची नोंद सिसमोग्राफव्दारे केली जाते?

 भूकंपाचे धक्के

 पावसाचे प्रमाण

 योग्य वेळ

 हवेचा दाब

उत्तर :भूकंपाचे धक्के

 10. महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस पिकाखालील क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

 परभणी

 यवतमाळ

 अमरावती

 वाशिम

उत्तर :यवतमाळ

 11. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणत्या दिवशी शपथ घेतली?

 25 ऑक्टोबर 2014

 27 ऑक्टोबर 2014

 31 ऑक्टोबर 2014

 1 नोव्हेंबर 2014

उत्तर :31 ऑक्टोबर 2014

 12. निवडणूक आयोगाने यंदाच्या मतदान प्रक्रियेत नव्याने समाविष्ट केलेला पर्याय NOTA चे विस्तृत रूप लिहा.

 नो टू ऑल

 नन ऑफ द अबोह

 नॉट अलाऊड

 यापैकी नाही

उत्तर :नन ऑफ द अबोह

 13. गुजरातमध्ये नर्मदा नदीवरील साधू बेटावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभरला जाणार आहे, त्याचे प्रस्तावित नाव काय आहे?

 स्टॅच्यू ऑफ आर्यन मॅन

 स्टॅच्यू ऑफ सरदार

 स्टॅच्यू ऑफ युनिटी

 स्टॅच्यू ऑफ फ्रिडम

उत्तर :स्टॅच्यू ऑफ युनिटी

 14. अन्नसुरक्षा कायदा भारतात कोणत्या साली लागू करण्यात आला?

 2012

 2013

 2014

 2015

उत्तर :2013

 15. दारिद्ररेषेखालील जन्मलेल्या मुलींकरिता महाराष्ट्र शासनाने जानेवारी 2014 पासून कोणती योजना सुरू केली?

 समृद्धि योजना

 सुकन्या योजना

 बेटी बचाव योजना

 निर्भया योजना

उत्तर :सुकन्या योजना

 16. दुधामध्ये कोणती शर्करा उपलब्ध असते?

 लॅक्टोज

 माल्टोज

 फ्रुक्टोज

 स्रूक्रोज

उत्तर :लॅक्टोज

 17. आहारात लोह खनिजाचे प्रामाण कमी असल्यास कोणता आजार होतो?

 क्षय

 डायरिया

 अॅनिमिया

 बेरीबेरी

उत्तर :अॅनिमिया

 18. पोलिओ लसीचा शोध खालीलपैकी कोणी लावला?

 एडवर्ड जेन्नर

 साल्क

 हरगोविंद खुराणा

 विल्यम हार्वी

उत्तर :साल्क

 19. एखादा माणूस पृथ्वीवरुन चंद्रावर गेल्यास-?

 वस्तुमान वेगळे पण वजन सारखेच राहील

 वस्तुमान व वजन दोन्ही सारखेच राहील

 वस्तुमान सारखे पण वजन वेगळे राहील

 वस्तुमान व वजन दोन्हीही वेगळे राहील

उत्तर :वस्तुमान सारखे पण वजन वेगळे राहील

 20. संगणकामध्ये रॅम याचा अर्थ काय होतो?

 रॅपीड अॅक्शन मेमरी

 रॅन्डम अॅक्सेस मेमरी

 राईल्ट अॅक्सेस मुव्हमेट

 रोल अँड मेमरी

उत्तर : रॅन्डम अॅक्सेस मेमरी

1) कोणत्या राज्यात ‘संगई महोत्सव’ आयोजित केला जातो?
उत्तर : मणीपूर

2) ‘एमिशन्स गॅप रिपोर्ट’ हा अहवाल कोणती संघटना प्रसिद्ध करते?
उत्तर : UNEP

3) IRDAI सुचविलेल्या नव्या टेलिमॅटिक्स मोटर विम्याचे नाव काय आहे?
उत्तर : नेम्ड ड्रायव्हर पॉलिसी

4) 12वा ‘फिल्म लंडन जरमन’ पुरस्कार कोणी जिंकला?
उत्तर : हितेन पटेल

5) 47 व्या आंतरराष्ट्रीय एम्मी पुरस्काराचा सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कार कुणी जिंकला?
उत्तर : मॅकमाफिया

6) भारतात ‘राष्ट्रीय दुग्ध दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : 26 नोव्हेंबर

7)  WATEC 2019 परिषद कुठे आयोजित करण्यात आली?
उत्तर : इस्त्राएल

8) “वॉटर 4 चेंज” नावाचा प्रकल्प कोणत्या राज्यात राबवण्याचा प्रस्ताव मांडला आहे?
उत्तर : केरळ

9) "राष्ट्रीय युवा संसद योजना"च्या संकेतस्थळाचे अनावरण कुणाच्या हस्ते करण्यात आले?
उत्तर : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद

10) महिलांवरील अत्याचारांच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 25 नोव्हेंबर

जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी

आजपासून विधानसभेचे हंगामी अधिवेशन

⚡ महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन आजपासून मुंबईतील विधानभवनात सुरू होणार आहे.

💁‍♂ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हे अधिवेशन आमंत्रित करण्याचे निर्देश विधिमंडळाच्या सचिवांना दिले आहेत.

👨‍💼 विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची मंगळवारी नियुक्ती झाली आहे.

📍 नव्या विधानसभेतील 287 आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्याचे काम कोळंबकर करतील.

🙌🏻 शपथविधी : हे अधिवेशन किती दिवसांचे असेल याचा राज्यपालांच्या आदेशात कुठेही स्पष्ट उल्लेख नाही. मात्र सर्व नवनिर्वाचित आमदारांच्या विधानसभा सदस्यत्वाचा शपथविधी होईपर्यंत हे अधिवेशन सुरू राहील, असे अंदाज आहे.

🛰 ‘कार्टोसॅट-3’चे आज श्रीहरिकोटातून प्रक्षेपण

💁‍♂ पृथ्वीच्या प्रतिमा आणि मॅपिंग करणाऱ्या ‘कार्टोसॅट-3’ उपग्रहाच्या प्रक्षेपणाला अवघे काही तास उरले आहेत.

🏢 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) दिलेल्या माहितीनुसार कार्टोसॅट-3 सोबत अमेरिकेच्या 13 नॅनो उपग्रहांचेही प्रक्षेपण होणार आहे.

⏳ श्रीहरिकोटा अवकाशतळावरील दुसऱ्या लाँचपॅडवरून 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.28 वाजता कार्टोसॅट-3 च्या प्रक्षेपणाचे नियोजन इस्रोने केले आहे.

🗣 पीएसएलव्ही-सी 47 च्या प्रक्षेपण मोहिमेच्या 26 तासांच्या उलटमोजणीला श्रीहरिकोटात सतीश धवन स्पेस सेंटरवर सुरुवात झाली आहे, असेही इस्रोने म्हटले.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) वाक्यात ज्या ठिकाणी स्वल्पविरामापेक्षा अधिक काळ थांबावे लागते, परंतु बोलणे मात्र पूर्ण होत नाही, त्या ठिकाणी..............
     हे चिन्ह वापरतात.

   1) “-”      2) ;      3) ,      4) !
उत्तर :- 2

2) ‘पापणीत गोठविली मी नदी आसवांची’ – अलंकार ओळखा.

   1) अतिशयोक्ती    2) रूपक      3) व्यतिरेक    4) दृष्टांत

उत्तर :- 1

3) अनुकरणवाचक गट निवडा.
   1) बडबड, किरकिर, फडफड    2) अर्ज, इनाम, जाहीर
   3) भाकरी, तूप, कांबळे      4) सायकल, सर्कस, सिनेमा

उत्तर :- 1

4) योग्य पर्याय निवडा.

   अ) अभिधा, लक्षणा व व्यंजना या तीन शब्दशक्ती आहेत.
   ब) यातून अनुक्रमे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ व व्यंगार्थ असे तीन अर्थ प्रगट होतात.

   1) अ आणि ब बरोबर  2) अ बरोबर ब चूक  3) अ चूक ब बरोबर  4) अ आणि ब दोन्ही चूक

उत्तर :- 1

5) ‘महान’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

   1) सुरेख    2) मोठा      3) छान      4) स्मृती

उत्तर :- 2

6) ‘तो घरी जातो’ या वाक्यातील प्रयोग कोणते ?

   1) सकर्मक कर्तरी    2) अकर्मक कर्तरी   
   3) कर्मणी      4) भावे

उत्तर :- 2

7) ‘जलद’ या सामासिक शब्दाच्या समासाचे नाव सांगा.

   1) विभक्ती – तत्पुरुष समास    2) अलुक – तत्पुरुष समास
   3) उपपद – तत्पुरुष समास    4) नत्र – तत्पुरुष समास

उत्तर :- 3

8) विरामचिन्हाचा वापर करताना एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात.

   अ) एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असल्यास    ब) ओकीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास
   क) दुस-याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना      ड) स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास

   1) फक्त क    2) अ व ड    3) ब व ड    4) अ व क

उत्तर :- 4

9) पुढीलपैकी कोणता शब्द ‘देशी’ आहे ?

   1) गाव      2) दूध     
   3) अत्तर    4) झाड

उत्तर :- 4

10) ‘आपली पाठ आपणास दिसत नाही.’ – या वाक्यातील ध्वन्यार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा.

   1) एकाचे दुस-याशी न जमणे        2) आपल्या भावाचे कृत्य आपणास समजत नाही
   3) आपलेच सगे सोयरे आपल्याला ओळखत नाही    4) स्वत:चे दोष स्वत:लाच दिसत नाही

उत्तर :- 4

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...