⭐️ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना इंग्रजी व्याकरण हा हमखास गुण मिळवून देणारा विषय आहे. आज आपण इंग्रजी व्याकरणातील 'Voice' अर्थात 'प्रयोग' हा विषय अभ्यासणार आहोत.
इंग्रजी व्याकरणात मराठी व्याकरणाप्रमाणे 3 प्रयोग नसून फक्त 2 प्रयोग असतात.
1) Active Voice (कर्तरी प्रयोग)
2) Passive Voice (कर्मनी प्रयोग)
⭐️ प्रयोगाचे गुणधर्म :
👉 Active Voice :
▪ यामध्ये वाक्याची सुरुवात कर्त्याने होते.
▪ वाक्यात कर्ता मुख्य असतो.
▪ वाक्यात कर्ता सक्रिय असतो.
▪ वाक्यातील क्रिया कर्त्यामार्फत केली जाते.
📊 या प्रयोगातील वाक्याची रचना साधारणतः Subject + Verb + Object अशी असते.
उदा. Sue changed the flat tire.
👉 Passive Voice :
▪ यामध्ये वाक्याची सुरुवात कर्माने होते.
▪ वाक्यात कर्म मुख्य असते.
▪ वाक्यात कर्ता निष्क्रिय असतो.
▪ वाक्यातील क्रिया कर्माकडून कर्त्यावर केली जाते.
📊 या प्रयोगातील वाक्याची रचना साधारणतः Object + Verb अशी असते.
उदा. The flat tire was changed by Sue.
No comments:
Post a Comment