Friday, 11 October 2019

UNICEF- क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करणारी संयुक्त राष्ट्रसंघाची पहिली संस्था

- संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF) या संघटनेनी “UNICEF क्रिप्टोकरन्सी फंड” नावाने नव्या कोषाची स्थापना केली आहे. येथे इथर आणि बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून निधी प्राप्त केले जाणार, साठविणे आणि वितरित केले जाणार.

- संयुक्त राष्ट्रसंघाची ही पहिलीच संस्था आहे जी जगभरातल्या बालकांना आणि तरुणांना फायदा देण्याच्या उद्देशाने मुक्त स्त्रोत तंत्रज्ञानासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करणार.

▪️क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

- क्रिप्टोकरन्सी हे एक डिजिटल आभासी चलन असून यामध्ये व्यवहारांच्या सुरक्षिततेसाठी, चलनाच्या नियंत्रणासाठी व पैसे पाठवणे याविषयी योग्यता तपासून पाहण्यासाठी क्रिप्टोग्राफीचा वापर केलेला असतो.

- आभासी चलन अर्थात ‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरले जाऊ शकते. 2009 साली सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली. एका संगणकीय प्रोग्रॅममधली गणितीय आकडेमोड करून ‘बिटकॉइन’ अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ संगणकीय जगात निर्माण झाल्या. अशा प्रकारच्या आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात.

- या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही नाही. कोणत्याही देशाच्या सीमेचे बंधन नसल्याने आणि कोणत्याही स्वरूपाचा कर त्यांना लागू होत नसल्याने गेल्या दशकभरात आभासी चलनाचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे गेल्या दशकभरात या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात पोहोचली आहे. अनेक देशांतील बँका, हॉटेल, कंपन्या, संकेतस्थळे यांनी आभासी चलनाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे या चलनाचे मूल्यही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातूनच या आभासी चलनांचे विनिमय बाजार उभे राहिले. बाजारांमध्ये जगभरातल्या आभासी चलनांचे भौतिक चलनांच्या तुलनेतले मूल्य दररोज ठरते. एकदा बिटकॉइनचे मूल्य 6 लक्ष 6 हजार रुपये इतके होते.

▪️UNICEF बाबत

- संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (United Nations Children's Fund -UNICEF) याचे मुख्यालय न्यूयॉर्क शहर (न्यूयॉर्क, अमेरिका) येथे आहे. UNICEF आधी दिनांक 11 डिसेंबर 1946 रोजी ‘युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड’ या नावाने तयार करण्यात आले होते, ज्यामधून द्वितीय विश्वयुद्धाच्या धर्तीवर प्रभावित झालेल्या बालकांना आपत्कालीन अन्न व आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी याची स्थापना केली गेली होती

- पोलंडचे डॉक्टर लुडविक राज्चमॅन हे UNICEFचे संस्थापक म्हणून ओळखले जातात आणि ते या संघटनेचे पहिले अध्यक्ष होते.

- पुढे 1950 साली सर्वत्र विकसनशील देशांमधील बालकांच्या आणि महिलांच्या दीर्घकाळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संघटनेचा विस्तार करण्यात आला.

-1953 साली तो संयुक्त राष्ट्रसंघाचा भाग बनला आणि नावामधील ‘इंटरनॅशनल’ व ‘इमर्जन्सी’ शब्द वगळण्यात आले, मात्र मूळ संक्षिप्त नाव काम ठेवण्यात आले. UNICEFचे कार्यक्षेत्र 190 देश आणि प्रांतांमध्ये पसरलेले आहे.
———————————————

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...