Wednesday, 30 October 2019

पंकज कुमार UIDAI चे नवे सीईओ :

🌸केंद्र सरकारने मोठे प्रशासनिक बदल केले आहेत. वरिष्ठ आयएएस अधिकारी संजीव नंदन सहाय यांची ऊर्जा विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सुभाष चंद्र गर्ग यांची जागा घेणार आहेत.

🌸तर माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त सचिव पंकज कुमार यांची ‘यूआयडीएआय’च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

🌸संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर गर्ग यांना अर्थ विभागाच्या सचिव पदावरून हटवून ऊर्जा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.

🌸त्यानंतर गर्ग यांनी सेवानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. ते सध्या तीन महिन्यांच्या नोटीसवर कार्यरत आहेत. गर्ग हे येत्या 31 ऑक्टोबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

🌸ब्रज राज शर्मा यांची कर्मचारी निवड आयोगाच्या (एसएससी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते गृह मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सीमा व्यवस्थापन विभागाच्या सचिवदी कार्यरत आहेत. तर ‘एनएचएआय’चे अध्यक्ष नागेंद्र नाथ सिन्हा हे ब्रज राज शर्मा यांची जागा घेणार आहेत. संजीव गुप्ता यांची गृह मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राज्य सचिवालय परिषदेत सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते याच विभागात विशेष सचिव म्हणून कार्यरत होते.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...