Friday, 18 October 2019

NITI आयोगाच्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2019’मध्ये कर्नाटक अव्वल

राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था (NITI) आयोगाने या वर्षीचा ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2019’ प्रसिद्ध केले आहे. ही यादी तयार करण्यात इंस्टीट्यूट फॉर कॉम्पटेटिवनेस या संस्थेनी नॉलेज पार्टनर म्हणून काम केले.

- या अभ्यासात नवकल्पनात्मक शोधांसाठी वातावरण तयार करण्यासाठी भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे या प्रयत्नांमध्ये येणारी आव्हाने आणि अडथळे दूर करून आर्थिक वाढीसाठी धोरणे आखण्यास मदत मिळते.

- मनुष्यबळ, गुंतवणूक, ज्ञानी कामगार, व्यवसायासाठी वातावरण, सुरक्षितता व कायदेशीर वातावरण, नॉलेज आउटपुट आणि नॉलेज डिफ्यूजन अश्या सात स्तंभावर हा अभ्यास केला गेला आहे.

▪️ठळक बाबी

- कर्नाटक हे नवकल्पनात्मक शोधाच्या क्षेत्रात भारतातले अव्वल राज्य ठरले. पायाभूत सुविधा, ज्ञानी कामगार, नॉलेज आऊटपुट आणि व्यवसायासाठी वातावरण या क्षेत्रात राज्याने सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

- शीर्ष 10 मध्ये समाविष्ट होणारी इतर राज्ये (अनुक्रमे) - तामिळनाडू, महाराष्ट्र, तेलंगणा, हरियाणा, केरळ, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात आणि आंध्रप्रदेश.

- ईशान्य व डोंगराळ राज्यांमध्ये अव्वल ठरलेले – सिक्किम राज्य. (त्यापाठोपाठ हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर, जम्मू व काश्मीर ही अव्वल पाच राज्ये)
केंद्रशासित प्रदेश / शहर राज्ये / छोट्या राज्यांमध्ये अव्वल ठरलेले - दिल्ली. (त्यापाठोपाठ चंदिगड, गोवा, पुडूचेरी, अंडमान व निकोबार बेटे)
दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तरप्रदेश ही उपलब्धतेला उपयोगी बाबींमध्ये रूपांतरित करण्यासाठी सर्वात कार्यक्षम राज्ये ठरली.

- मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्य जरी तिसर्‍या क्रमांकावर असले तरीही राज्याने नवकल्पक शोधकार्यांसाठी मनुष्यबळ, गुंतवणूक, ज्ञानी कामगार, व्यवसायासाठी वातावरण, सुरक्षितता व कायदेशीर वातावरण या क्षेत्रांमध्ये सर्वोत्कृष्ट सक्षम वातावरण बनविल्याचे आढळून आले आहे.
—————————————-——

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...