🔖 1आॅक्टोबर 1958 पासुन संस्थेचे कामकाज चालु
🔖 स्थापना - 29 जुलै 1958
🔖 मुख्यालय - वॅशिंग्टन डी सी
🔖 सध्याचे अध्यक्ष - जिम ब्रिडेनस्टिन
🔹नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) ही अंतराळ संशोधन करणारी अमेरिकन संस्था आहे.
🔹 अमेरिकेतील आधीच्या नॅशनल अॅड्वायझरी कमिटी ऑफ एरोनॉटिक्स ऊर्फ नाका या संस्थेच्या जागी, नासा स्थापण्यात आली.
🔹शीतयुद्ध काळात सोव्हियत संघाच्या अंतराळ कार्यक्रमाला टक्कर देण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयसनआवर आणि सिनेटर लिण्डन बी जॉन्सन यांनी नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनच्या(नासा) स्थापनेच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याला वेग दिला. आणि २९ जुलै १९५८ मध्ये ती अस्तित्वात आली. तेव्हापासून आतापर्यंत नासाने अनेक यशस्वी अंतराळ योजना राबवल्या आहेत.
🔹नासाने आपलं पहिलं अंतराळ यान एक्सप्लोअरर-१ हे १९५८ मध्ये लाँच केलं. या अंतराळ संशोधन संस्थेने आतापर्यंत अनेक यशस्वी योजना राबवल्या असून चंद्रावर पहिलं मानवी पाऊल ठेवण्याचं श्रेय नासालाच जातं.
🔹 विराट विश्वाची ‘आभाळमाया’ नेमकी कशी आहे त्याचा ‘प्रत्यक्ष’ धांडोळा घेणारा एक शक्तिशाली ‘डोळा’ १९९० मध्ये ‘नासा’या अमेरिकेचा अवकाशविज्ञान संस्थेने अवकाशात पाठवला आणि त्याने दैदीप्यमान कामगिरी करून विश्वातील ग्रह, तारे, दीर्घिका, तेजोमेघ या सर्वांची लाखो तेजस्वी छायाचित्रं पृथ्वीकडे पाठवली.
आता मंगळावर जीवन आहे की नाही यासाठी या संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात नासा ही जगात अग्रस्थानी आहे.
No comments:
Post a Comment