Saturday, 5 October 2019

विद्युत चुंबकीय बल (Electromagnetic Force) :

· सामान्य पदार्थातील अणूंना व रेणूंना एकत्रित ठेवणार्याप बलास 'विद्युत चुंबकीय बल' असे म्हणतात.

· विधूतचुंबकीय बल गुरुत्वबलापेक्षा अनेक पटींनी मोठे आहे. उदा. हायड्रोजनच्या अनुमधील इलेक्ट्रॉन व प्रोटॉनमधील विधुत चुंबकीय बल जवळजवळ 10-7N असते.

इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांच्यावर प्रयुक्त गुरुत्वबल क्रमश: जवळपास 10-41N आणि 10-34N एवढे असते.

· विधुतचुंबकीय बलामुळेच नुकत्याच वापरलेल्या कंगव्याने कागदाचे बारीक कपटे ओढले जातात.

· लोखंडी खिळ्यावर लोहचुंबकामुळे प्रयुक्त झालेले बल हा विधुतचुंबकीय बलाचा प्रकार आहे.

· आपण निसर्गातील जी बहुतांश बले अनुभवतो, ती विधुत चुंबकीय बलेच असतात.

· धनप्रभारीत आणि ऋणप्रभारीत असे दोन प्रकारचे कण विधूतचुंबकीय बलात भाग घेतात.

· स्थिर विधुतकण गतीमान असतील तरच चुंबकीयबल प्रयुक्त होते. विधुतचुंबकीय बल आकर्षणबल किंवा प्रतिकर्षणबल असे शकते.

· अनुमधील इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांच्यातील परस्पर आकर्षणाला कारणीभूत बल हे विधूतचुंबकीय बलच असते. त्यामुळे अणूंचे अस्तित्व टिकून असते.

· गुरुत्वबल आणि विधुतचुंबकीय बल ही दोन्ही बले दोन वस्तु बऱ्याच अंतरावर असतानासुद्धा कार्यरत असतात. या दोन्ही बलांना दीर्घमर्यादा क्षेत्र असलेली किंवा लांब पल्ल्याची बले असे म्हणतात.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...