Thursday, 10 October 2019

डेन्मार्कमध्ये ‘C40 जागतिक महापौर शिखर परिषद 2019’ आयोजित

👉 डेन्मार्क या देशाची राजधानी कोपेनहेगन येथे 9 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2019 या काळात ‘C40 जागतिक महापौर शिखर परिषद 2019’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

👉 कार्यक्रमात शाश्वत, आरोग्यदायी, अनुकूल अश्या आणि सर्वसमावेशक भविष्यासाठी आवश्यक असलेल्या ठळक हवामानविषयक उपाययोजनांना वेग देऊन जगभरातली ‘C40’ समूहातली शहरे आपली बांधीलकी कशी दर्शवित आहेत याचे प्रदर्शन प्रस्तुत करणार आहेत.

❇️ C40 समुहाबद्दल :

▪️‘C40 शिखर परिषद’ पहिल्यांदा सन 2005 मध्ये लंडन (ब्रिटन) येथे भरविण्यात आली होती.

▪️हा समूह सन 2005 मध्ये ऑक्टोबर महिन्यात तयार करण्यात आला.

▪️समूहाचे सचिवालय लंडन (ब्रिटन) येथे आहे.

▪️‘C40’ समूह हा हवामानातल्या बदलांशी लढा देण्यासाठी आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन आणि हवामानविषयक जोखीम कमी करणार्‍या शहरी कृतींवर लक्ष केंद्रित करते, ज्यामुळे शहरी नागरिकांचे आरोग्य, त्यांचे कल्याण आणि आर्थिक संधींमध्ये वाढ होण्यास मदत होते.

▪️‘C40 शहरे’ या समूहात आज जगभरातल्या अग्रेसर असलेल्या 94 शहरांचा समावेश आहे, जे 700 दशलक्षाहून अधिक नागरिकांचे आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या एक चतुर्थांश भागाचे प्रतिनिधित्व करतात.

▪️‘C40 जागतिक महापौर शिखर परिषद’ अग्रेसर असलेली शहरे, व्यवसाय आणि नागरिकांची जागतिक युती तयार करते, जी पृथ्वीला आवश्यक असलेल्या मूलगामी आणि महत्वाकांक्षी हवामानविषयक कृतींवर भर देते.

▪️‘C40’ शहरांचे महापौर स्थानिक पातळीवर 4 नोव्हेंबर 2016 रोजी लागू झालेल्या हवामानविषयक पॅरिस कराराची महत्वाकांक्षी उद्दीष्टे पूर्ण करण्यास वचनबद्ध आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...