Sunday, 26 December 2021

निशाचर प्राणी कसे जगतात ?

◼दिवसा दडुन विश्रांती घेणारे व रात्रीच्या वेळीच क्षुधाशमनाला बाहेर पडणारे प्राणी म्हणजे निशाचर प्राणी.

◼यांची रात्रिचर्या हा एक जीवनाचा भागच असतो. त्यांची शरीररचनाही त्याला सोयीची असते.

◼प्रकाशाशिवाय वावरता यायला मुख्यत: अन्य इंद्रियांचा सुलभ वापर आवश्यक असतो.

◼नाकाने अगदी सूक्ष्मा गंधही ओळखणे, कानाला अतिदूरवरचे व जमिनीतून मिळणाऱ्या हादर्‍यातुन संदेश मिळणे किंवा तीक्ष्ण स्पर्शज्ञान असणे हे या प्राण्यांच्या बाबतीत विशेष आवश्यक ठरते.

◼स्वतःचा जीव अन्य आक्रमकांपासून वाचवणे व निसर्गाचा समतोल राखणे या दृष्टीने ही रचना निसर्गानेच केली असावी.
,
◼एखाद्या परिसरात सारे काही बारा तास चिडीचूप असावे, यापेक्षा रोज दिवसा काही प्राणी, तर रात्री निशाचर निसर्गात राबता ठेवतात.

◼यामुळे पाणी, अन्न, वावरायला जागा या उपलब्धी आपोआपच दुभागल्या जाऊन सोयीच्या होतात.

◼अनेक प्राण्यांना दिवसाचे चौदा तास झोप लागते; पण ही झोप फार सावध असते. जराशीही चाहूल लागली तरी कुत्रा व मांजर जसे कान टवकारते, तसाच हा प्रकार असतो. त्यामुळे ही झोपेची वेळ कधीची हा प्रश्न निशाचर प्राणी सहज सोडवतात. रात्रीचे आठ ते दहा तास त्यांचे उद्योग सलग चालतात.

◼अनेक कीटक, सरपटणारे प्राणी, छोटे सस्तन प्राणी, अपृष्ठवंशीय प्राणी यांचा निशाचरांत समावेश होतो.

◼ पक्षी मात्र सहसा रात्री उडत नाहीत. खोल पाण्यातील मासे त्यांच्या हालचाली सोयीने करतच राहतात; पण सर्वसाधारण जलचर मात्र विश्रांती घेतात.

◼घुबडे, वटवाघळे त्यांच्या चित्कारातुन मिळणाऱ्या परतीच्या संदेशातून सहजगत्या माहिती मिळवुन वावरतात.

◼बिळात वास्तव्य करणारे प्राणी जमिनीतील ध्वनीच्या कंपनांद्वारे हालचाली करतात. काही प्राण्यांना असलेल्या लांबलचक मिशाही त्यांना उपयोगी पडतात. एखाद्या जागी आपला डोक्याचा शिरकाव होईल वा नाही, याचा नेमका अंदाज मिशांवरून त्यांना सहज येतो.

◼निशाचर प्राण्यांमुळे जंगल कधी झोपले आहे, असे होतच नाही. भक्त ही हालचाल खजबज, खुसपूस, चित्कार या स्वरूपातच जाणवते.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...