👉इन्फोसिसचे संस्थापक डॉ. एन. आर. नारायण मूर्ती यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
👉थर्मेक्स कंपनीच्या माजी अध्यक्षा अनू आगा यांना रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
👉सन्मानचिन्ह, मानपत्र, अडीच लाख रुपये रोख व रयत वस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
रयत शिक्षण संस्थेचा शंभरावा वर्धापन दिन शुक्रवारी साजरा होणार आहे. हा कार्यक्रम कर्मवीर समाधी परिसराच्या प्रांगणात पार पडणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, रयत परिवाराचे माजी कार्याध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील, विद्यमान कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, उप कार्याध्यक्ष भगीरथ शिंदे, सहसचिव (माध्यमिक) विजय सावंत, सहसचिव (प्राथमिक) विलास महाडिक उपस्थित राहणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीची वाटचाल उलघडून दाखवणारा रयत शिक्षण पत्रिका या कर्मवीर विशेषांकाचे प्रकाशन शरद पवार व डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे
बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी विजयादशमीच्या मुहुर्तावर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी काले (ता. कराड) येथे सत्यशोधक समाज परिषदेत रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यात ७३७ शाखा १३५५३ सेवकांचे ज्ञानदान व ४५८०४४ विद्यार्थी इतका मोठा पसारा असणारी ही संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था समजली जाते. रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांनी 'नॅक'ची प्रतिष्ठित नामांकने प्राप्त केली असून शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र साताऱ्यात सुरू होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
No comments:
Post a Comment