- केरळमधील नन मरियम थ्रेसिया यांच्यासह इतर चार जणांना रविवारी व्हॅटिकन सिटीमध्ये झालेल्या भव्य समारंभात सेंट फ्रान्सिसने संत पदवी दिली. तिच्या मृत्यूनंतर 93 वर्षांनंतर नन मेरी थ्रेसिया यांना ही उपाधी देण्यात आली.
- सिस्टर थ्रेसिया यांचे वयाच्या 50 व्या वषी 8 जून 1926 रोजी निधन झाले होते. महिलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱया मरियम थ्रेसिया यांनी बऱयाच शाळा स्थापन केल्या होत्या. त्यांचा जन्म 3 मे 1876 रोजी झाला होता. विशेष म्हणजे केरळमध्ये सामाजिक उन्नतीसाठी प्रसिद्ध असलेल्या थ्रेसिया यांना ‘मदर तेरेसा’ यांच्यासारखे मानले जाते.
- व्हॅटिकन सिटीच्या सेंट पीटर स्क्वेअरमध्ये नन मरियम थ्रेसिया यांना संत मान देऊन सन्मानित करण्यात आले. सिस्टर थेसिया यांनी 50 वर्षांच्या स्वतःच्या अल्प आयुष्यात मानवतेच्या भल्यासाठी केलेले कार्य जगासाठी अद्भूत उदाहरण आहे असे सांगत स्वतःसाठी नव्हे तर इतरांकरता जगणाऱया असामान्य लोकांची जन्मभूमी आणि कर्मभूमी भारत राहिला आहे.
▼
No comments:
Post a Comment