Friday, 11 October 2019

पनामा कालवा: अटलांटिक व पॅसिफिक महासागर जोडणारा अभियांत्रिकी शास्त्राचा उत्कृष्ट नमूना

🔺कालव्याचे बांधकाम पूर्ण होऊन १०६ वर्षे पूर्ण झाली 

◾️जगातील माननिर्मित आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण होऊन आज १०६ वर्षे पूर्ण झाली. १९१३ साली आजच्याच दिवशी अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी व्हाइट हाऊसमधून टेलिग्राफ सिग्नलच्या माध्यमातून या कालव्याचे उद्घाटन केले. असे असले तरी ३ ऑगस्ट १९१४ रोजी कालव्यामधून जाहजांची वाहतूक सुरु झाली. या कालव्यामुळे अटलांटिक व पॅसिफिक महासागर जोडले गेले. कालव्याच्या अटलांटिक किनाऱ्यावर कोलोन तर पॅसिफिक किनाऱ्यावर पनामा ही बंदरे आहेत. पनामा कालव्याची लांबी ८० किमी आणि रुंदी १८० ते ३३० किमी आहे. या कालव्यामुळे अमेरिकेच्या अटलांटिक व पॅसिफिक किनाऱ्यामधील अंतर कमी झालेले आहे. पनामा कालव्यामुळे संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया, संयुक्त संस्थाने ते जपान हे अंतर कमी झाले आहे. जाणून घेऊयात आधुनिक अभियांत्रिकी शास्त्राचा सर्वोत्तकृष्ट नमूना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनामा कालव्याबद्दलच्या खास गोष्टी…
पनामा कालवा हा मध्य अमेरिकेच्या पनामा देशामधील एक कृत्रिम कालवा आहे. हा कालवा अटलांटिक महासागराच्या कॅरिबियन समुद्राला प्रशांत महासागरासोबत जोडतो.

>
पनामा कालवा जगातील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या जलमार्गांपैकी एक आहे. हा कालवा वापरणाऱ्या जहाजांची वार्षिक संख्या १९१४ साली १००० होती तर २००८ पर्यंत ही संख्या १४,७०२ पर्यंत पोचली होती. २००८ सालापर्यंत एकूण ८.१५ लाख जहाजांनी पनामा कालव्याचा वापर केला होता.

>
ह्या कालव्याच्या बांधणीसाठी अनेक नैसर्गिक व कृत्रिम तलावांचा वापर करण्यात आला. हे तलाव

समुद्रसपाटीपासून सुमारे २६ मी उंच असल्यामुळे पनामा कालव्यामध्ये दोन्ही बाजूंना बंदिस्त बांध (लॉक्स) बांधले आहेत. ह्या बांधांमध्ये अनुक्रमे पाणी सोडत आत शिरणाऱ्या जहाजांना वर चढवले जाते. कालव्यामधून बाहेर पडणाऱ्या जहाजांसाठी उलटी क्रिया करून खाली उतरवले जाते. सध्याच्या घडीला ह्या बांधांची रूंदी ११० फूट आहे. पनामा कालव्याची एकूण लांबी ७७.१ किमी (४८ मैल) आहे.

>
अमेरिकन स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेने पनामा कालव्याचा आपल्या जगातील सात नव्या आश्चर्यांपैकी एक असल्याचे सांगत या कालव्याचा आधुनिक युगातील आश्चर्यांच्या यादीमध्ये समावेश केला आहे.
>

पनामा कालवा बांधण्यापूर्वी प्रशांत महासागरामधून अटलांटिक महासागरात पोचण्यासाठी बोटींना दक्षिण अमेरिका खंडाला वळसा घालून धोकादायक मेजेलनच्या सामुद्रधुनीमधून प्रवास करावा लागत असे. मध्य युगापासून हा प्रवास टाळण्यासाठी मानवनिर्मित कालव्याची कल्पना मांडली जात होती.

>
पनामाचे मोक्याचे स्थान व अरूंद भूमीचा पट्टा पाहता येथेच हा कालवा काढणे सहजपणे शक्य होते. रोमन साम्राज्याचा राजा पहिला कार्लोस याने १५३४ साली ह्या कालव्यासाठी पाहणी करण्याचे आदेश दिले होते. १८५५ साली अमेरिकेने पनामा कालव्याचा प्रस्ताव मांडला. ह्याच काळात सुवेझ कालव्याचे निर्माण करण्यात फ्रेंचांना यश मिळाल्यामुळे पनामा कालव्याच्या बांधकामाबद्दल स्थापत्यकारांना हुरूप आला.

>
११८१ साली फ्रान्सने पनामा कालव्याचे बांधकाम हाती घेतले. परंतु सुमारे २८ कोटी अमेरिकन डॉलर खर्च केल्यानंतर हा उपक्रम दिवाळखोरीत निघाला व १८९० साली काम थांबले.

>
पुढील १३ वर्षे अमेरिकेने अनेक पाहण्या व अभ्यास केले. अखेर १९०४ साली राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्टच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने ह्या कालव्याचे हक्क विकत घेतले व बांधकाम पुन्हा सुरू झाले. अनेक अडचणींचा सामना करीत अमेरिकन अभियंत्यांनी १९१४ साली कालव्यामधून जाहजांची वाहतूक सुरु झाली. १९९९ सालापर्यंत पनामा कालव्याचा ताबा अमेरिकेकडेच होता.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...