Sunday, 6 October 2019

दिल्ली-कटरा एक्स्प्रेसमुळे काश्मीरच्या विकासाचा प्रवास सुरू

1)  अनुच्छेद 370 हा जम्मू व काश्मीरच्या विकासातील अडथळा होता आणि दिल्ली-कटरा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यामुळे या भागाच्या विकासाचा प्रवास सुरू होईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

2)  तर रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह व हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत शहा यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर या गाडीला हिरवी झेंडी दाखवला.

3)  अनुच्छेद 370 रद्द करणे आणि दिल्ली-कटरा वंदे भारत एक्स्प्रेसची सुरुवात या दोन गोष्टींमुळे नवा भारत नव्या जम्मू-काश्मीपर्यंत येईल आणि या भागासाठी नवा इतिहास घडवला जाईल, असे मंत्र्यांनी सांगितले.

4)  तसेच येत्या दहा वर्षांमध्ये जम्मू व काश्मीर हा देशाच्या सर्वाधिक विकसित भागांपैकी एक राहील आणि वंदे भारत एक्स्प्रेसच्या सोबतीने विकासाचा प्रवासही सुरू झाला आहे.

5) या गाडीमुळे विकासाला, तसेच धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल असे शहा यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...