Tuesday, 1 October 2019

उत्तरप्रदेशात प्राचीन नदीचे उत्खनन

👉केंद्रीय जल मंत्रालयाने प्रयागराज (पूर्वी अलाहाबाद) येथे गंगा आणि यमुना नदींना जोडणार्‍या जुन्या व कोरड्या पडलेल्या नदीचे उत्खनन केले आहे.

👉संभाव्य भूजलाचा पुनर्भरण स्त्रोत म्हणून या भागाला विकसित करणे हा या उत्खनन करण्यामागे हेतू होता.

🌹🌳🌴नदीचे अस्तित्व🌴🌳🌹

👉शोधलेली नदी ही प्रयागराज या शहराजवळ गंगा-यमुना संगमाच्या सुमारे 26 किलोमीटर दक्षिणेस दुर्गापूर गावात यमुना नदीला जोडणारी पुरलेली पालेओ वाहिनी होती.

👉वर्णन केल्याप्रमाणे ही प्राचीन नदी सुमारे 4 किलोमीटर रुंद, किलोमीटर लांबीची असून, नदीचे अवशेष मातीखाली 15 मीटर जाडीचा थरात दिसून येतात.

👉 एक पालेओ वाहिनी (paleochannel) प्रयागराज (पूर्वी अलाहाबाद) जवळ गंगा आणि यमुना नदींना जोडते.

🌹🌳🌴नदीचा शोध कसा लागला?🌴🌳🌹

👉उत्तरप्रदेशात प्रयागराज आणि कौशांबी प्रदेशाच समावेश असलेल्या भौगोलिक सर्वेक्षणादरम्यान CSIR-NGRI (नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) आणि केंद्रीय भूजल मंडळाच्या शास्त्रज्ञांना डिसेंबर 2018 मध्ये या नदीचा शोध लागला.

👉प्रदेशात असलेल्या पालेओ वाहिन्या (paleochannels) अस्तित्त्वात नसलेल्या नद्यांचा मार्ग उघडकीस आणतात.

👉अहवालात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की पालेओ वाहिन्यांच्या पुराव्यांनुसार पौराणिक ‘सरस्वती’ नदी अस्तित्त्वात आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...