◾️ रॉयल स्विडिश अकॅडमीकडून आज रसायन शास्त्रातील नोबेलची घोषणा करण्यात आली.
◾️ हा पुरस्कार अमेरिका, ब्रिटन आणि जपानमधील तीन शास्त्रज्ञांना विभागून देण्यात येणार आहे.
◾️लिथिअम-आयन बॅटरीच्या संशोधनासाठी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
📌जॉन बी. गुडइनफ,
📌एम. स्टॅनली व्हायटिंघम आणि
📌अकिरा योशिनो अशी या
तीन नोबेल पुरस्कार जाहीर झालेल्या रसायन शास्त्रज्ञांची नावे आहेत.
◾️लिथिअम-आयन बॅटरीमुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरांच्या विश्वात क्रांती झाली आहे.
◾️या बॅटरीमध्ये मोठ्या प्रमाणावरील ऊर्जा छोट्या स्वरुपात साठवून ठेवता येते. या बॅटरीच्या संशोधनामुळे कार, लॅपटॉप, मोबाईल फोन्स आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे हे पोर्टेबल झाली आहेत.
◾️नोबेल समितीने या पुरस्काराबाबत म्हटले की, १९७० मधील तेल संकट हे लिथिअम-आयन बॅटरीच्या संशोधनाचे मूळ आहे.
◾️तेव्हा व्हायटिंघम यांनी जीवाश्म इंधनमुक्त ऊर्जा निर्माण करण्याचे तंत्र विकसित करण्याचे ध्येय ठेवले होते. या बॅटरीने आपल्या जीवनात क्रांती आणली आहे.
📌९ लाख १८ हजार अमेरिकन डॉलर, 📌एक गोल्ड मेडल असे रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे स्वरुप आहे.
◾️१० डिसेंबर रोजी नॉर्वेतील स्टॉकहोम आणि ओस्लो येथे हे नोबेल पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
No comments:
Post a Comment