Friday, 4 October 2019

चीन मिसाईलचे आज अनावरण

✍चीनमध्ये आज राष्ट्रीय दिवस साजरा केला जाणार  आहे. या निमित्त चीन ताकदीचे प्रदर्शन करणार आहे.

✍तर रस्त्यांवर 15 हजार जवान आणि अनेक अत्याधुनिक शस्त्रात्रांचे प्रदर्शन होणार आहे.

✍तसेच यामध्ये असेही एक मिसाईल आहे जे अमेरिकेच्या उरात धडकी भरवू शकते. चीन ते अमेरिका हे अंतर केवळ 20 मिनिटांत पार करू शकण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे. याशिवाय अन्य काही शस्त्रास्त्रे आहेत जी याआधी दाखविण्यात आली नव्हती.

✍Dongfeng-17 एक लघू मध्यम पल्ल्याचे मिसाईल आहे जे हाइपरसोनिक ग्‍लाइड व्हेईकल लाँच करू शकते. हे मिसाईल आवाजाच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने अंतर कापते. एवढेच नाही तर हे मिसाईल अमेरिकेच्या सुरक्षा प्रणाली
शिल्ड मिसाईलला भेदण्याची क्षमता ठेवते.

✍उड्डान करताना हे मिसाईल त्याच्या लक्ष्यानुसार उंची कमी किंवा जास्त करू शकते. याशिवाय हे मिसाईल आण्विक हत्यारांशिवाय कव्हेंशन वायरहेड नेण्यासही सक्षम आहे.

✍2017 मध्ये या मिसाईलची चाचणी झाली होती. या मिसाईलने पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाऊन पुन्हा कक्षेत येण्याचा विक्रम केला होता.

✍तर मिसाईलचे पूर्ण नाव Dongfeng-41 आहे. ही आयसीबीएम मिसाईल पहिल्यांदाच परेडमध्ये भाग घेणार आहे. ही मिसाईल 10 मॅकच्या वेगाने उड्डाण करते. या मिसाईलची रेंज 7500 मैल असून जगातील कोणत्याही भागात काही मिनिटांत हल्ला चढवू शकते.

✍या मिसाईलमुळे चीन अमेरिकेवर केवळ 20 मिनिटांत हल्ला करू शकते. महत्वाचे म्हणजे एका वेळी ही मिसाईल 10 लक्ष्यांचा भेद करण्यास सक्षम आहे.

✍तसेच अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. अमेरिका आणि रशियाकडेही अशा प्रकारची मिसाईल आहे. तसेच रडारलाही ही मिसाईल सापडत नाही. या मिसाईलमुळे चीनला वेगवेगळ्या ठिकाणी मिसाईल तैनात करण्यापासून मुक्ती मिळाली आहे.

✍विमान दिसायला साध्या प्रवासी विमानासारखे आहे. मात्र, या विमानातून लांबच्या ठिकाणी बॉम्बवर्षाव करता येतो. नॅशनल डे परेडच्या रिहर्सलवेळी हे विमान दिसले आहे. सहा विमानांनी आकाशात कसरती केल्या होत्या. या वेळी या विमानांना KD-20/CJ-10K आणि KD-63 क्रूझ मिसाईल लावलेली होती. हे विमान हवेतल्या हवेत इंधन भरू शकते.

No comments:

Post a Comment