Thursday, 17 October 2019

जागतिक भूक निर्देशांकात भारताची मोठी घसरण

◾️ जागतिक भूक निर्देशांकात २०१९ मध्ये  भारताचा १०२ वा क्रमांक लागला असून
◾️ २०१८ मध्ये तो ११७ देशांत ९५ व्या स्थानावर होता.

◾️ त्यामुळे आता नेपाळ, पाकिस्तान व बांगलादेश या देशांनंतर भारताचा क्रमांक आहे.

◾️ बेलारूस, युक्रेन, तुर्की, क्युबा व कुवेत या देशांनी वरचे क्रमांक पटकावले आहेत.

जागतिक भूक निर्देशांकाच्या  संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे.

◾️याबाबतचा अहवाल ‘कन्सर्न  वल्र्डवाइड’ ही आयरिश संस्था तसेच वेल्ट हंगर हिल्फी ही जर्मन संस्था यांनी संयुक्तपणे तयार केला असून भारताची परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे.

◾️२००० मध्ये भारताचा ११३ देशात ८३ वा क्रमांक होता, तर
◾️आता ११७ देशात तो १०२ वा आहे. यातील भारताचे गुण २००५ मध्ये ३८.९ होते ते २०१० मध्ये ३२ झाले, नंतर २०१० मधील ३२ वरून ते २०१९ मध्ये ३०.३ झाले आहेत.

◾️ घटक

📌कमी पोषण,
📌उंचीच्या तुलनेत कमी वजन,
📌 पाच वर्षांखालील मुलांचे उंचीच्या तुलनेत कमी वजन,
📌मुलांची वाढ खुंटणे,
📌 कुपोषण,
📌बालमृत्यू दर,
📌पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यू दर हे घटक यात विचारात घेतले जातात.

◾️कमी वजनाच्या मुलांचे प्रमाण २००८-२०१२ या काळात १६.५ टक्के होते ते २०१४-२०१८ या काळात २०.८ टक्के  झाले.

◾️६ ते २३ महिने वयोगटातील पुरेसे पोषण मिळणाऱ्या बालकांचे प्रमाण ९.६ टक्के होते.

◾️सगळ्या देशात भारतातील मुले वजनाच्या तुलनेत उंचीच्या निकषात मागे पडली असून त्यांचे प्रमाण २०.८ टक्के आहे.

◾️येमेन, दिजबौती या देशांनीही या निकषात भारताला मागे टाकले आहे.

📌नेपाळ (७३),
📌 श्रीलंका (६६),
📌 बांगलादेश (८८),
📌म्यानमार, (६९),
📌  पाकिस्तान (९४) या देशांची स्थिती भूकेबाबतीत वाईट असली तरी ती भारताइतकी वाईट नाही.

◾️चीनचा क्रमांक २५ वा लागला आहे.

◾️पाच वर्षांखालील बालकांचा मृत्यू दर, वाढ खुंटणे, अपुरे अन्न मिळून कमी पोषण या निकषात भारताची कामगिरी सुधारली आहे.

◾️स्वच्छ भारत योजना भारताने लागू केली असली तरी अजून भारत देश हागणदारी मुक्त झालेला नाही. तेथे उघडय़ावर शौचास जाण्याची पद्धत सुरूच आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आहे, असे अहवालात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...