Monday, 7 October 2019

जागतिक स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा

◾️यामधील वैद्यकशास्त्रामधील नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ऑक्सिजन सामावून घेण्याच्या पेशी प्रक्रियेचा उलगडा करणाऱ्या वैज्ञानिकांना यंदाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर झाले आहे.

◾️विल्यम जी.केलिन, सर पीटर जे. रेटक्लिफ, ग्रेग सेमेन्झा याना संयुक्तरित्या २०१९ नोबेल जाहीर करण्यात आले आहे.

◾️सोमवारी स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये यंदाच्या नोबेल पुरस्काराची घोषणा झाली. अमिरेकेचे विलियम केलिन आणि ग्रेग सेमेन्जा आणि ब्रिटेनचे सर पीटर जे. रेटक्लिफ यांना संयुक्तरित्या नोबेल पुरस्कार दिला आहे. मंगळवारी भौतिकशास्त्रामधील आणि १४ ऑक्टोबर रोजी इतर सहा क्षेत्रामधील नोबेल पुरस्काराची घोषणा होणार आहे.

◾️ऑक्सिजन सामावून घेण्याच्या पेशी प्रक्रियेचा उलगडा या तिन्ही वैज्ञानिकांनी केला आहे. ऑक्सिजनच्या मात्रामुळे आपल्या सेलुलर मेटाबोलिज्म आणि शारीरिक हालचालीवर प्रभाव करतो. या वैज्ञानिकांच्या शोधामुळे एनिमिया, कँसर आणि अन्य आजारांवरील उपाय जलद होऊ लगाले.

🔷 नोबेल पुरस्काराचे स्वरूप 🔷

◾️नोबेल पुरस्कार म्हणून सन्मानपत्र, सुवर्णपदक (१७५ ग्रॅम), रोख रक्कम ९ मिलियन स्विडिश क्राऊड म्हणजे १४ लाख अमेरिकन डॉलर अर्थात भारतीय ७ कोटी ७० लाख रुपये एवढी आहे.

◾️सुवर्णपदकाचे मूल्य लावले तर ते ५० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. काही पुरस्कारार्थींनी त्याची बोली लावून विक्री केली होती. त्यातून त्यांना कोट्यवधी रुपयांची प्राप्ती झाली होती.

No comments:

Post a Comment