Friday, 11 October 2019

वाहन उद्योगात सणासुदीतही मंदी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 12 Oct 2019, 02:38 AM

वाहन उद्योगक्षेत्रातील मंदी सणासुदीच्या दिवसांतही हटताना दिसत नाही. सप्टेंबरमध्ये एकूण कारविक्रीमध्ये तब्बल २३.६९ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. कारविक्रीत घट होण्याचा हा सलग अकरावा महिना ठरला. विशेष म्हणजे, दुचाकींच्या विक्रीलाही फटका बसला असून त्यांच्या विक्रीतही सुमारे २४ टक्के घट झाली आहे.

वाहन उद्योगक्षेत्रातील मंदी सणासुदीच्या दिवसांतही हटताना दिसत नाही. सप्टेंबरमध्ये एकूण कारविक्रीमध्ये तब्बल २३.६९ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. कारविक्रीत घट होण्याचा हा सलग अकरावा महिना ठरला. विशेष म्हणजे, दुचाकींच्या विक्रीलाही फटका बसला असून त्यांच्या विक्रीतही सुमारे २४ टक्के घट झाली आहे. कार उद्योजकांची संघटना सियामने (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स) शुक्रवारी ही आकडेवारी प्रसिद्ध केली.
ऑक्टोबरमधील दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरमध्ये कारच्या मागणीत वाढ होणे अपेक्षित होते. मात्र तसे घडल्याचे दिसत नाही. कारखरेदीसाठी सर्वसामान्य नागरिक अद्याप अनुत्सुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. सप्टेंबरमध्ये एकूण २,२३,३१७ कारची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात कारविक्रीचा आकडा २,९२,६६० होता. सप्टेंबरमध्ये देशांतर्गत कारविक्रीमध्येही ३३.४ टक्के घट झाली असून १,३१,२८१ युनिट्स विकली गेली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये १,९७,१२४ कार विकल्या गेल्या होत्या. व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतही ३९ टक्के घट झाली असून सप्टेंबरमध्ये या प्रकारच्या वाहनांची विक्रीसंख्या ५८,४१९वर सीमित राहिली. आश्चर्याची बाब म्हणजे सप्टेंबरमध्ये दुचाकींची विक्रीही मंदावली. या महिन्यात दुचाकींची विक्री २३.२९ टक्क्यांनी कमी होऊन १०,४३,६२४वर मर्यादित राहिली

📕सियाम आशावादी📕

चालू महिन्याच्या गेल्या १०-१२ दिवसांमध्ये वाहनांच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. दिवाळीमध्ये वाहनांची चांगली विक्री होईल. सरकारने केलेल्या विविध उपाययोजना व दिवाळीदरम्यान विक्रेत्यांकडून देण्यात येणाऱ्या सवलती यांमुळे या महिन्यात कारविक्रीची संख्या उत्साहवर्धक असेल, अशी आशा सियामचे अध्यक्ष राजन वढेरा यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...