Friday, 18 October 2019

स्टार्टअप इंडिया योजनेंतर्गत गेल्या चार वर्षात देशभरात १९ हजार ३५१ स्टार्टअप

*⃣ उद्योगांची नोंदणी झाली असून सर्वाधिक ३ हजार ६६१ स्टार्टअप उद्योगांची नोंदणी महाराष्ट्रात झाली.

*⃣ देशातील राज्यांमध्ये स्टार्टअप उद्योगात झालेल्या वैकल्पिक गुंतवणुकीतही या योजनेंतर्गत महाराष्ट्राने आघाडी घेत दुसरा क्रमांक मिळवला आहे.

*⃣ केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्यावतीने १६ जानेवारी २०१६ पासून देशभरात “ स्टार्टअप इंडिया ” योजनेची अंमलबजावणी सुरु झाली.

*⃣ केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग व देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने २४ जून २०१९ रोजी राज्यनिहाय स्टार्टअप उद्योगांची यादी जाहिर करण्यात आली.

*⃣ या यादीत देशातील २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांची आकडेवारी जाहिर करण्यात आली असून ३ हजार ६६१ स्टार्टअप उद्योगासह महाराष्ट्र प्रथम स्थानावर आहे.

*⃣ महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक (२,८४७), दिल्ली (२,५५२) उत्तरप्रदेश (१,५६६) तर १ हजार ८० स्टार्टअपसह तेलंगना पाचव्या स्थानावर आहे.

No comments:

Post a Comment