Tuesday, 8 October 2019

वैद्यकीय नोबल यंदा विल्यम केलीन, पिटर रॅटक्लिफ,जॉर्ज सेमेन्झा यांना

●  वैद्यकीय संशोधनासाठीचा जगातील सर्वाधिक मानाचा नोबल पुरस्कार विल्यम केलीन (ज्यनियर), सर पिटर जे. रॅटक्लिफ आणि जॉर्ज एल सेमेन्झा यांना घोषीत करण्यात आला आहे.

●  उपलब्ध ऑक्सिजनमधून पेशी तो कसा मिळवतात, याबाबत त्यांनी केलेल्या संशोधनाचा सन्मान करण्यात आला.

● ऑक्सीजनच्या पातळीला प्रतिसाद देताना ती नियमित करण्यातील गुणसुत्रांचे कार्य त्यांनी सिध्द केले.

★ पुरस्काराचे स्वरुप

● साडेचार कोटी रुपये, २०० ग्रॅम सोन्याचे पदक आणि प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

● पदकाच्या एका बाजूला नोबेल पुरस्कारचे जनक आल्फ्रेड नोबेल यांचे छायाचित्र, त्यांच्या जन्म आणि मृत्यूची तारीख लिहिलेली असते.

● तर पदकाच्या दुसऱ्या बाजूला युनानी देवी आइसिसचे चित्र आणि पुरस्कारार्थींची माहिती असते.

★ वितरण

● १९०१ ते २०१८ या कालावधीत वैद्यकीय क्षेत्रातील २१६ व्यक्तींना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

● २१६ व्यक्तींपैकी आतापर्यंत १२ महिलांना पुरस्कार देण्यात आला आहे. २००९ साली दोन महिलांना हा पुरस्कार देण्यात आला.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...